अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. आपला दिनक्रम, चित्रपट, कुटुंबाबाबत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. चाहत्यांनी संवाद साधण्याचा हा तिचा अनोखा फंडा आहे. प्राजक्ता मध्यंतरी हिमाचल ट्रिपला गेली होती. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून मिळालेला निवांत वेळ तिने एण्जॉय केला. आता तिच्या पावसाळी ट्रिपची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.
आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील बिनधास्त मुलगी वनिता खरातचे आजवरचे सर्वात बोल्ड लूक
प्राजक्ता एकटीच नव्हे तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाची संपूर्ण टीम पावसाळी ट्रिपसाठी लोणावळा इथे गेली होती. याचदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे स्वतःचे निसर्गाच्या सानिध्यामधील काही फोटो तसेच एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोमध्ये हिरवागार निसर्ग, डोंगर, घनदाट जंगल पाहायला मिळत आहे. तसेच पावसाळी वातावरण अगदी लक्ष वेधून घेणारं आहे. प्राजक्ताचे हे फोटो, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका युजरने म्हटलं की, “काय ते डोंगार, काय ती प्राजक्ता, काय ते फोटो, एकदम ओके”. तर दुसऱ्या युजरने “अप्रतिम प्राजु” अशी कमेंट केली आहे.
आणखी वाचा – “लग्नापूर्वीच गरोदर असणं म्हणजे…”; अभिनेत्री दिया मिर्झाचं वक्तव्य चर्चेत
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने लोणावळ्यामध्ये पावसाळी ट्रिपचा आनंद लुटला. समीर चौघुले, नम्रता संभेराव या कलाकारांनी यादरम्यानचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासू प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरु होईल. म्हणजेच प्रेक्षकांना पुन्हा एकदा मनोरंजनाचा डबल डोस अनुभवायला मिळणार आहे.