मराठीतील आघाडी अभिनेत्री प्रिया बापट ही नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. प्रिया ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती अनेकदा तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखले जाते. उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. नुकतंच प्रिया बापटने तिच्या आई वडिलांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रिया बापटने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या आई-वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत तिने तिचा जुना फॅमिली फोटोही पोस्ट केला आहे. यासोबतच तिने तिला हटके कॅप्शन दिले आहे. यात ती फार भावूक झाली आहे.
“माझ्यात आणि दिघे साहेबांमध्ये…”, अभिनेता सलमान खानची ‘धर्मवीर’ चित्रपटाबद्दल पहिली प्रतिक्रिया
प्रिया बापटची खास पोस्ट
“प्रिय आई – बाबा,
बाबा, वडील म्हणून, मुलगा म्हणून तुम्ही बेस्ट आहातच आणि कायम असाल. पण, तुमच्या आणि आईच्या ३८ वर्षांच्या संसारात तुम्ही सर्वांत बेस्ट होतात. आर्थिक बाजू तर तुम्ही सांभाळलीच पण सांसारिक सर्व जबाबदार्यांमधे तुमच्या आणि आईच्या पार्टनरशिपला तोड नाही.
मुलांचे लाडही दोघांनीही केले आणि आोरडाही दोघांनीही दिला. शाबासकी, कौतुक दोघांनी केलं. अगदी आई घरी नसताना स्वयंपाकाही केलात आणि कधीही अवलंबून न राहण्याची शिकवण दिलीत. आर्थिक अडचण आोढवल्यावर मॅट्रीकही न झालेली आईने घराबाहेर पडून तुमच्या बरोबरीने काम करून आर्थिक जबाबदारी पार पाडली. एरवी नाजूक तब्बेतीची आई तुम्हाला जरा बरं नाहीसं झालं तर सगळं बळ एकवटून झाशीची राणी व्हायची. आणि आईसाठी तुम्ही जे गेली ३ वर्ष केलत, तिची सेवा, प्रेम ते क्वचितच कोणी नवरा आपल्या बायकोसाठी करत असेल. इतकं निस्वार्थ प्रेम.
तुम्हा दोघाची मुलं म्हणून श्वेता आणि मी जन्माला आलो, तुमच्यासारख्या आई वडिलांची सेवा करता येणं हेच आमच्या जन्माचं सार्थक आहे. आईची कमतरता कायमच जाणवेल. आज तुमच्या वाढदिवशी Mother’s Day आहे म्हणून दोन्ही शुभेच्छा तुम्हालाच. आईकडे आता जादूची कांडी आहे, तुमच्या कडे आशिर्वाद आहेत. ते दोन्ही आमच्या पाठीशी असू देत. तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो.” असे प्रिया बापटने म्हटले.
“…ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट”, पतीने ‘चंद्रमुखी’बद्दल केलेल्या पोस्टवर अमृता खानविलकरची खास कमेंट
प्रिया बापट ही ‘आनंदी आनंद’, ‘शुभंकरोती’ या मालिकांमधून घराघरात पोहोचली. प्रियाने ‘काकस्पर्श’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा नवा ठसा उमटविला. ‘वजनदार’, ‘आम्ही दोघी’, ‘हॅपी जर्नी’, ‘टाइम प्लीज’ या चित्रपटांमधील तिच्या भूमिकाही विशेष गाजल्या. मराठी चित्रपटांप्रमाणेच प्रियाने ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस’, ‘लगे रहो मुन्नाभाई’ या हिंदी चित्रपटामध्येही छोटेखानी भूमिका पार पाडली आहे.
नागेश कुकुनूर यांच्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या हिंदी वेबसीरिजमधून प्रिया बापटने डिजिटल माध्यमामध्ये पदार्पण केले. प्रियाने आतापर्यंत साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. मात्र व्यक्तिगत जीवनात प्रियाची प्रतिमा एक अवखळ मुलगी अशी आहे.