बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. लग्नानंतर प्रियांका चोप्रा पती निक जोनससह अमेरिकेत स्थायिक झाली. करोनानंतर तब्बल तीन वर्षांनी बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा भारतात परतली आहे. प्रियांका चोप्रा भारतात परतल्यानंतर तिचा विमानतळावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे प्रियांका चोप्राने भारतात परतल्यानंतर अनेक स्टोरी शेअर केल्या आहेत. त्यात तिने तिला मुंबईची किती आठवण येत होती याबद्दल सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रियांका चोप्रा ही मध्यरात्री भारतात परतली. तिचा एक एअरपोर्ट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यात ती फार आनंदात, चेहऱ्यावर हसू ठेवून पापाराझींना पोज देत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रियांकाने विमान मुंबई विमातळवर लँड झाल्यानंतर एक फोटो शेअर केला होता. त्यात तिने अखेर परतली… असं म्हटलं आहे. त्यानंतर विमानतळावरुन ती घरी जात असताचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओत मुंबईतील रस्ते पाहायला मिळत आहे. त्यावर ‘मुंबई मेरी जान’ असे म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : भारतात परतलेल्या प्रियांका चोप्राचा पहिला व्हिडीओ समोर, फोटोग्राफर्सना पाहून…

प्रियांका तिच्या मुंबईतील घरी पोहोचताच तिने एक फोटो शेअर केला आहे. यात ती विश्रांती घेताना दिसत आहे. यावेळी ती समोर टीव्हीवर कॉफी विथ करण हा शो पाहताना दिसत आहे. याला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “जर तुम्ही टीव्हीवर करण जोहरचा शो पाहिला नसेल तर तोपर्यंत तुम्ही मुंबईत नाहीत.” असे ती म्हणाली आहे. याबरोबर तिने तिच्या आवडत्या वेफर्सचे फोटोही शेअर केले आहेत.

आणखी वाचा : “विकी कौशलविषयी बोललो की तू…” सलमान खानने कतरिना कैफसमोर केली उघडपणे कमेंट

यानंतर आता प्रियांका चोप्राने आणखी एक फोटो शेअर केला आहे. यात तिने तिच्या घरातून दिसणारा वरळी ते बांद्रा सी-लिंकचा फोटो शेअर केला आहे. “मी हे मोहक दृश्य पाहण्यासाठी फार तरसले होते”, असे कॅप्शन दिले आहे.

दरम्यान प्रियांकाने शेअर केलेले हे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. हे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. प्रियांका ही लवकरच रुसो ब्रदर्सच्या ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. यासोबतच प्रियांका बऱ्याच वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याही भूमिका असणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress priyanka chopra back to mumbai after 3 years share special memories nrp