बॉलिवूडची अभिनेत्री आणि आता हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा, लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. मात्र सध्या ती भारतात आली आहे. मुंबईत आपल्या घरी राहिल्यानंतर तिने लखनौ गाठले आहे. सध्या ती सध्या भारतात युनिसेफचं काम करत आहे. लखनऊमधील युनिसेफच्या ऑफिसचा दौरा केला. याशिवाय तिने कम्पोजिट स्कुल औरंगाबाद आणि एका अंगणवाडी केंद्रालाही भेट दिली आणि तिथल्या लहान मुलांशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लखनौ शहरात ती कामाच्या निमित्ताने जरी गेली असली तरी तिने तिकडच्या स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. नुकतीच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत त्यात एका चाट पदार्थाचा फोटो टाकला आहे. ‘चाट ब्रेक थँक यू युनिसेफ या ट्रीटसाठी’ असा कॅप्शनदेखील दिला आहे. लखनौ शहर पहिल्यापासून खवय्यांचे शहर म्हणून ओळखले गेलेआहे. आजही ते मुघलकालीन पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. या शहराला ऐतिहासिक महत्वदेखील आहे.

‘चाहत्याशी गप्पा मारल्या, त्याच्याच मुलाला कडेवर घेतलं’, बॉलिवूडच्या ‘या ‘अभिनेत्याचं होतंय सर्वत्र कौतुक

दरम्यान त्याआधी प्रियांका चोप्राने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यात ती म्हणाली होती, “मी युनिसेफसाठी लखनऊमध्ये आलेय. मी खरंच लखनऊ दौऱ्याची वाट पाहत होते. मी बालपणी काही वर्षे लखनऊमधील शाळेत घालवली आहेत. इथे माझे नातेवाईक आणि मित्रपरिवार आहे आणि उत्तर प्रदेशातील महिला आणि मुलांसाठी ही जागा कशी चांगली ठरत आहे हे समजून घेण्याची मला उत्सुकता आहे.” असं ती म्हणाली

प्रियांकाच्या चाहत्यांना तिच्या आता हिंदी चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. आलिया भट कतरीना कैफबरोबर लवकरच ती ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर करणार असून पुढच्यावर्षी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होईल असे खुद्द प्रियांकाने इंडियाटुडेला सांगितलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress priyanka chopra enjoying chat items in lucknow share story on instagram spg