बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांका ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती कायमच तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. प्रियांका आणि निक जोनस यांच्या लग्नाला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. जानेवारी महिन्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज दिली होती. त्यानंतर काही दिवस प्रियांकाने सोशल मीडियातून ब्रेक घेतला होता. सध्या प्रियांकाची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
प्रियांका चोप्राने नुकतंच तिच्या इनस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रियांका ही तिच्या लॉस एंजिल्सच्या राहत्या घरातून व्हिडीओ काढत असल्याचे दिसत आहे. यावेळी तिच्या घराच्या बाजूला चोली के पिछे क्या है…. हे गाणे वाजताना दिसत आहे. हे गाणे ऐकल्यानंतर प्रियांकाचे पायही थिरकायला लागले आहेत.
तेजश्री प्रधान लवकरच करणार छोट्या पडद्यावर कमबॅक, म्हणाली “मी पुनरागमन करण्यासाठी…”
हा व्हिडीओ शेअर करताना प्रियांका ही फार खूश असल्याचे दिसत आहे. “लॉस एंजिल्समधील आठवणीतील एक दिवस, पण मला यासाठी आमंत्रण का दिले नाही?” असे प्रियांकाने कॅप्शन देताना म्हटले आहे. तिचा हा व्हिडीओ आणि तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
“त्यांच्यासाठी वय ही फक्त एक संख्या…”, ‘आई कुठे काय करते’ मधील संजनाची आप्पांसाठी खास पोस्ट
प्रियांका चोप्रा ही परदेशात राहूनही भारत देशावर फार प्रेम करते. ती अनेकदा भारताबद्दल विविध पोस्ट शेअर करत आठवणी ताज्या करत असते. हॉलिवूडमध्ये सक्रीय असणारी प्रियांकाही भारतातील प्रत्येक सण आणि सभारंभ साजरी करत असते.
दरम्यान प्रियांका चोप्रा ही लवकरच बॉलिवूडमधील जी ले जरा या चित्रपटात दिसणार आहे. प्रियांका तिच्या आगामी चित्रपटाबाबत खूप उत्साही आहे. प्रियांकासोबत या चित्रपटात आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.