Radikaa Sarathkumar on Justice Hema Committee Report: जस्टिस हेमा कमिटीच्या रिपोर्टमध्ये मल्याळम सिनेसृष्टीत (Malayalam Industry) महिलांनी काही अभिनेत्यांवर अत्याचारांचे आरोप केले आहेत, त्यानंतर अनेक अभिनेत्री समोर येऊन त्यांच्याबरोबर घडलेले प्रसंग सांगत आहेत. आता लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनी यावर प्रतिक्रिया देत धक्कादायक खुलासा केला आहे. महिला कलाकारांची ही अवस्था फक्त मल्याळम सिनेमांपुरती मर्यादित नाही. या गोष्टी तमिळ आणि तेलुगू इंडस्ट्रीतही घडतात. पुरुष व्हॅनिटी व्हॅनमध्ये छुपे कॅमेरे लपवून अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात, असा दावा त्यांनी केला आहे.

“मी स्वत: पुरुषांना सेटवर एकत्र बसून त्यांच्या मोबाइलमध्ये असे व्हिडीओ बघताना पाहिलंय,” असं राधिका एशियानेट न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या. “मी केरळमध्ये सेटवर असताना काही लोक एकत्र जमले होते, ते काहीतरी पाहत होते आणि हसत होते. मी तिथून जाताना माझ्या लक्षात आलं की ते एक व्हिडिओ पाहत आहेत. मी क्रू मेंबरला कॉल केला आणि त्याला विचारलं की ते काय पाहत आहेत. मला त्याने सांगितलं की व्हॅनिटी व्हॅनमध्ये कॅमेरे आहेत आणि त्यात महिलांचे कपडे बदलतानाचे फुटेज रेकॉर्ड करण्यात आले आहेत. तुम्ही फक्त कलाकाराचं नाव सांगायचं, तिचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ तुम्हाला मिळतील. मी तो व्हिडीओ पाहिला होता,” असं राधिका सरथकुमार यांनी सांगितलं.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Punha kartvya ahe
Video : “आता शिक्षेला…”, वसुंधरा व तनयाला जलसमाधी घ्यावी लागणार; ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये काय घडणार?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Aishwarya And Avinash Narkar dance video
नारकर जोडप्याचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! Video पाहून मराठी अभिनेत्री म्हणते, “हा ग्रुप कसा जॉईन करायचा…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”

“गरोदर असताना त्याने पोटावर लाथ मारली”, लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या अभिनेत्याबद्दल पहिल्या पत्नीने केलेले धक्कादायक खुलासे

नावं घेण्यास दिला नकार

ही घटना कुठे घडली हे सांगण्यास राधिका यांनी नकार दिला आणि म्हणाल्या, “जर आपण तोंड आकाशाकडे करून थुंकलो तर ते आपल्याही तोंडावर पडेल, त्यामुळे मला नावं घ्यायची नाहीत.” महिला कलाकारांना याबद्दल सांगितलं अशी माहिती त्यांनी दिली. “ही गोष्ट चुकीची आहे. या घटनेनंतर मी इतर महिला कलाकारांना छुप्या कॅमेऱ्यांबाबत सांगितलं. या घटनेनंतर मला माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायला भीती वाटत होती. कपडे बदलणे, आराम करणे किंवा जेवणे या आमच्या खासगी गोष्टी आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

१०व्या वर्षांची असताना सेटवर लैंगिक अत्याचार झाला; दिग्गज अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “माझ्या आईने जाब विचारल्यावर त्यांनी…”

पुढे त्या म्हणाल्या, “मी व्हॅनमध्ये महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ पाहिले आहेत. मी टीमला याबाबत जाब विचारला आणि हे चुकीचं आहे असं म्हटलं. मी व्हॅन टीमला सांगितलं की जर गाडीत मला कॅमेरा सापडला तर मी चपलेने मारेन. मला खूप राग आला होता, मला सुरक्षित राहायचे आहे आणि व्हॅन अजिबात नको असा मी आग्रह धरला. त्यानंतर या प्रकरणात लक्ष घालू असं ते म्हणाले होते.”

Raadhika Sarathkumar
अभिनेत्री राधिका सरथकुमार (फोटो – इन्स्टाग्राम )

सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”

उर्वशीसारख्या कलाकारांनी सेटवर व्हॅन सुरक्षित आहे, असं म्हटलंय. त्याबाबत विचारल्यावर राधिका म्हणाल्या, “मी उर्वशीची मुलाखत पाहिली. केरळ इंडस्ट्रीत लैंगिक अत्याचार होत नसल्याचं तिने म्हटलं. ती केरळ आणि मल्याळम फिल्म इंडस्ट्रीची आहे. तिथून तिचा उदरनिर्वाह होतो. ती उत्तम अभिनेत्री आणि माझी चांगली मैत्रीण आहे. पण या संदर्भात आमची मतं वेगळी आहे. हे फक्त केरळच नाही तर इतर राज्यांमध्येही घडतं.”

या इंडस्ट्रीत ४६ वर्षांपासून काम करतेय, माझ्याबरोबर बऱ्याचदा गैरवर्तन करण्याचे प्रयत्न झाले, असंही राधिक सरथकुमार म्हणाल्या.

Story img Loader