Ranya Rao Gold Smuggling : कन्नड चित्रपट अभिनेत्री रान्या रावला ३ मार्च रोजी बेंगळुरूच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यता आली. तिच्याजवळ जवळपास १५ किलो सोनं आढळलं. तिने इतक्या सोन्याची तस्करी कशी केली, त्यासंदर्भात माहिती उघड झाली आहे. कस्टम अधिकाऱ्यांपासून बचावासाठी तिने काय केलं, त्याचा खुलासा तिनेच केला आहे.

३३ वर्षांची रान्या राव ही कर्नाटकमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे तिला विमानतळावर सोन्याची तस्करी करताना अटक केली.

रान्या रावने जॅकेटमध्ये सोनं लपवून तस्करी केल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार तिने सोनं जॅकेटमध्ये लपवलं नव्हतं. तिने दुबईतून सोनं लपवून भारतात कसं आणलं त्याबद्दल डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

अभिनेत्री रान्या रावला एक किलो सोन्याच्या तस्करीसाठी किती पैसे मिळायचे? तपासातून मोठी माहिती उघड

तान्याने सोनं भारतात कसं आणलं?

रान्याने तिच्या मांड्यांवर टेप आणि क्रेप बँडेजने प्रत्येकी १ किलो वजनाची सोन्याची १४ बिस्किटं लपवली होती. मांड्यावरील बिस्किटं दिसू नये यासाठी तिने पँट घातली होती, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.

रान्याने सोन्याची तस्करी करण्यासाठी जी पद्धत वापरली, ते पाहून तिने यापूर्वीही हीच पद्धत वापरली असावी, अशी शक्यता नाही. तिला विमानतळावरील प्रोटोकॉलची माहिती होती, त्यामुळे तिने इतकं जास्त सोनं तस्करी करून भारतात आणलं. अलिकडच्या काळात बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोन्याच्या सर्वात मोठ्या जप्तींपैकी एक असल्याचं डीआरआय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Chhaava: ‘छावा’ ठरला यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा, एकूण कलेक्शन किती? वाचा…

मागील काही महिन्यांत रान्या राव वारंवार दुबई व मलेशियाला जात होती. ५ ते १० दिवसांच्या आत ती प्रवास करत होती, त्यामुळे तिच्यावर संशय बळावला. अखेर ३ मार्च रोजी ती मोठ्या प्रमाणात सोनं घेऊन भारतात येत असल्याची गुप्त माहिती डीआरआय अधिकाऱ्यांना मिळाली, त्याआधारे त्यांनी कारवाई केली.

मुख्य म्हणजे रान्या बंगळुरू विमानतळावरुन बाहेर पडण्यासाठी व्हीआयपी चॅनेल्सचा वापर करत होती. ती यायची तेव्हा एक प्रोटोकॉल अधिकारी तिला रिसीव्ह करण्यासाठी यायचा आणि व्हीआयपी चॅनेल्समधून सुरक्षित बाहेर सोडायचा. तिची सामान्य प्रवाशांप्रमाणे सखोल तपासणी व्हायची नाही.

सोमवारी रान्या बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली तेव्हा तिचा पतीही तिच्याबरोबर होता. या दोघांचे ४ महिन्यापूर्वीच लग्न झाले आहे. या सोन्याच्या तस्करीत रान्याचा पती सहभागी आहे की नाही याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच या सोनं तस्करीत रान्याची भूमिका नेमकी काय आहे त्याचा तपास सुरू आहे.

अनुराग कश्यप मुंबई सोडून या ठिकाणी झाला स्थायिक, बॉलीवूडचा ‘Toxic’ उल्लेख करत म्हणाला, “इथले लोक…”

तिच्या संपर्कात नसल्याचा वडिलांचा दावा

रान्याचे सावत्र वडील रामचंद्र राव यांनी चार महिन्यांहून अधिक काळापासून तिच्या संपर्कात नसल्याचा दावा केला आहे. तसेच माध्यमांमधून रान्याला अटक झाल्याचं समजल्याने धक्का बसला आहे, असंही त्यांनी नमूद केलं. दुसरीकडे रान्या व तिचा पती रामचंद्र राव यांचा मुलगा म्हणजे रान्याच्या सावत्र भावाच्या लग्नाला फेब्रुवारीत गेले होते, असंही म्हटलं जात आहे.

रान्याच्या अटकेनंतर, डीआरआय अधिकाऱ्यांनी तिच्या घरी घेतलेल्या झडतीत २.६ कोटी रुपयांचे दागिने, २.६७ कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण १७.२९ कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली आहे, असं डीआरआय अधिकाऱ्यांनी सांगितलं. रान्याला १८ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

रान्याच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास तिने २०१४ मध्ये २२ व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिने तीन कन्नड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या होत्या.

Story img Loader