अभिनेत्री रश्मिका मंदाना तिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर जगभरात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. दक्षिणात्य सिनेसृष्टीबरोबरच हिंदी मनोरंजन सृष्टीतही तिने पाऊल टाकलं आहे. तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे ती चर्चेत असते. तर आता तिची मोठी फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
रश्मिका मंदानाच्या मॅनेजरने तिची फसवणूक केली आहे. हा मॅनेजर तिच्या करिअरच्या सुरुवातीपासून तिचा मॅनेजर म्हणून काम करत होता. तर आता फसवणूक झाल्यानंतर रश्मिकानेही त्याच्याविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे.
‘पिंकविला’च्या रिपोर्टनुसार, या मॅनेजरने रश्मिका मंदानाला ८० लाखांचा गंडा घातला. या झालेल्या फसवणुकीबद्दल समजतात रश्मिकाने मॅनेजर पदावरून त्याची हकालपट्टी केली. या घडलेल्या प्रकाराबद्दल रश्मिकाने कोणताही अधिकृत व्यक्तव्य केलेलं नाही. हे प्रकरण तिने वैयक्तिक पातळीवर सोडवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणालाही न सांगता तिने या मॅनेजरला काढून टाकलं.
हेही वाचा : Video: …अन् श्रीवल्ली मराठीत बोलू लागली, रश्मिका मंदानाचा मराठमोळा अंदाज चर्चेत
दरम्यान, रश्मिका तिच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. सध्या ती बहुप्रतीक्षित ‘पुष्पा २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. तर याचबरोबर नुकतंच तिने रणबीर कपूरबरोबर ‘ॲनिमल’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.