आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. भारतात तसेच भारताबाहेर असणाऱ्या तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. या चित्रपटामुळे रश्मिकाला वेगळी ओळख मिळाली. या चित्रपटातील तिच्या नृत्याचंही खूप कौतुक झालं. तिच्या ‘सामी सामी’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं. पण आता रश्मिकाने या गाण्यावर नाचण्यासाठी चक्क नकार दिला आहे.
रश्मिकाला भेटण्यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी तिथे चाहते खूप आतुर असतात. नुकतंच तिच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ट्विटरवर ‘आस्क मी एनीथिंग’ सेशन घेतलं. या सेशनच्या मार्फत रश्मिका ने तिच्या चाहत्यांशी भरपूर गप्पा मारल्या आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. सेशनदरम्यान एका चाहत्याने तिला भेटण्याची आणि तिच्याबरोबर ‘सामी सामी’ या गाण्यावर नृत्य करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र रश्मिकाने मात्र याला स्पष्ट नकार दिला.
आणखी वाचा : Video: …अन् श्रीवल्ली मराठीत बोलू लागली, रश्मिका मंदानाचा मराठमोळा अंदाज चर्चेत
ट्विटरवर एका चाहत्याने तिला विचारलं की, “मला तुझ्यासोबत सामी सामी गाण्यावर डान्स करायचा आहे. मी करू शकतो का?” त्यावर रश्मिकाने उत्तर दिलं, “मी इतक्या वेळा सामी सामीची स्टेप केली आहे की आता मला वाटतं मी म्हातारी झाल्यावर मला पाठीचा त्रास होईल. मी भेटल्यावर आपण वेगळं काहीतरी करूया.” आता तिचं हे उत्तर खूप चर्चेत आलं असून तिचे चाहते यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
हेही वाचा : ‘अशी’ झाली रश्मिका मंदानाला मराठी गाण्यांची ओळख; खुलासा करत म्हणाली, “लहानपणी मी…”
‘पुष्पा’ प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटातील हे गाणं तुफान हिट झालं. तर आतापर्यंत अनेक कार्यक्रमांमधून रश्मिकाने या गाण्यावर नाच केला आहे. दरम्यान आता या चित्रपटाचा दुसरा भाग यावर्षी प्रदर्शित होणार असून रश्मिका सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातून रश्मिका पुन्हा एकदा श्रीवल्लीच्या भूमिकेत शिक्षकांना दिसणार आहे.