सध्या चलती आहे ती वेगवेगळ्या विषयांवर आधारित वेबसीरिजची. वेबसीरिजचा एक वेगळाच प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. शिवाय बॉलिवूडमधील कित्येक कलाकार देखील या डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. वेबसीरिज या माध्यमातून प्रेक्षकांना उत्तम कथा देखील अनुभवायला मिळतात. एखाद्या वेबसीरिजचा पहिला सीझन प्रदर्शित झाला की त्याचा दुसरा सीझन कधी येणार याची प्रेक्षर आतुरतेने वाट पाहत असतात. अशीच एक वेबसीरिज म्हणजे ‘मिर्झापूर’.
‘मिर्झापूर’ वेबसीरिजचे आतापर्यंत २ सीझन प्रदर्शित झाले आणि या वेबसीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ‘मिर्झापूर’च्या सगळ्याच कलाकारांनी आपल्या वाट्याला आलेली भूमिका अगदी चोखपणे पार पाडली. आता ‘मिर्झापूर’चं तिसरं सीझन कधी येणार? याची सारे जण वाट पाहत होते. आता ही प्रतिक्षा संपली आहे असं म्हणायला हरकत नाही. लवकर ‘मिर्झापूर’चं तिसरं सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अमेझॉन प्राईमची ही वेबसीरिज उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवर आधारित आहे. या सीरिजमधील कलाकार रसिका दुग्गलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे की, “मिर्झापूर सीझन ३ येणार….आता हा सीझन कधी येईल हे अमेझॉन प्राईम व्हिडीओलाच विचारावं लागेल. चांगल्या गोष्टींसाठी नेहमीच वाट तर पाहावी लागते. तयार राहा.”
आणखी वाचा – आली लहर केला कहर! अचानक विमानतळावरच वर्कआऊट करायला लागली शिल्पा, VIDEO VIRAL
रसिकाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘मिर्झापूर’मधील कलाकार आणि काही नवीन कलाकारांचे चेहरे दिसत आहेत. कालिन भैय्या आणि गुड्डूचं भांडण, त्यातून निर्माण होणारे वाद, अॅक्शन, ड्रामाने या वेबसीरिजचं क्रेझ प्रेक्षकांमध्ये अधिक वाढलं. पंकज त्रिपाठी, कालिन भैय्या, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल यांसारख्या कलाकारांनी या वेबसीरिजमध्ये उत्तम काम केलं आहे. आता या सीरिजच्या तिसऱ्या भागामध्ये वेगळं काय पाहायला मिळणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.