मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत ऋतुजा बागवे हिचा देखील समावेश होतो. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमात काम करत ती प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. अभिनयाबरोबरच ऋतुजा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. ऋतुजा तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी ती चाहत्यांना सांगत असते. नुकतंच तिने सोशल मीडियावर एक रील पोस्ट केले, ज्याची सगळीकडे चर्चा आहे.
आणखी वाचा : “मला तुझा खूप अभिमान आहे,” माधुरी दीक्षितने केले अमृता खानविलकरचे कौतुक
ऋतुजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला विविध पदार्थ बनवायची आवड आहे, हे सांगितले आहे. अनेकदा ती तिने बनवलेल्या पदार्थांचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. आता नुकतेच तिने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आणि दर्शनासाठी जाताना बाप्पाला स्वतःच्या हाताने बनविलेले उकडीचे मोदक प्रसाद म्हणून घेऊन गेली. मोदक बनवतानाचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मोदकाचे सारण बनवण्यापासून ते मोदक उकडण्यापर्यंत सारं काही तिने स्वतःच्या हाताने केलं. त्यानंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताना ते मोदक तिने एका डब्यातून नेले व लालबागच्या राजाला अर्पण करून बाप्पाचा आशीर्वाद घेतला. यावेळी तिच्याबरोबर तिचे आई – वडील आणि धाकटी बहीणही होते. तिच्या या व्हिडीओवर तिचे चाहते भरपूर कमेंट्स करत तिचे कौतुक करताना दिसत आहेत. तिच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
हेही वाचा : ‘मी तुमची ही कमेंट दुर्लक्षित करु शकते पण…’ नेटकऱ्याच्या प्रश्नावर भडकली हेमांगी कवी
ऋतुजाच्या कामाबद्दल सांगायचे तर, ‘अनन्या’ हे तिचे नाटक खूपच गाजत आहे. या नाटकात तिने एका दिव्यांग मुलीची भूमिका साकारली आहे. या नाटकातील ऋतुजाच्या कामाचं भरभरून कौतुक होत आहे. त्याशिवाय सध्या ऋतुजा तिच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या कामात व्यग्र असल्याचे दिसून येत आहे