मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये सई ताम्हणकरचं नाव टॉपला आहे. सईने मराठी चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस केलं. ती इथवरच थांबली नाही. बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने सईला ‘मिमी’ या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आलं. अभिनयाच्या बरोबरीने ती फोटोशूटसाठी चर्चेत असते. नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे ज्यावरून तिला ट्रोल करण्यात आले आहे.
सई सोशल मीडियावर सक्रीय असते, फोटोतून ग्लॅमर्स अंदाज दिसून येतो. नुकतेच तिने शेअर केले आहेत ज्यात ती जमिनीवर बसली आहे. तिने टॉप आणि पॅन्ट परिधान केले आहे. ‘संडे पिक्चर्स’ असा कॅप्शनदेखील दिला आहे. तिच्या याच फोटोवरून आता तिला ट्रोल केलं जात आहे. एकाने तिच्या बसण्याच्या पद्धतीवर टीका केली आहे, त्याने लिहले आहे “फरशी पुसताना चुकून तोल जातो तेव्हा,” तर दुसऱ्याने लिहले आहे “लादी पुसतानादेखील ग्लॅमर्स दिसते.”
“तारक मेहता बंद होणार….” घसरलेल्या TRPवर मालिकेतील अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण
एकाने तर तिची तुलना चक्क ‘पालीशी’ केली आहे. त्याच म्हणणं आहे की, “मोबाईल उलटा केल्यास पाल छताला चिकटलेली दिसते.” मात्र काही जणांनी तिचे कौतुक केले आहे. ‘छान’, ‘सुंदर’, ‘नेहमीप्रमाणे जबरदस्त’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
सई नुकतीच‘इंडिया लॉकडाऊन’ चित्रपटात झळकली होती. २ डिसेंबर २०२२ रोजी झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. सई व्यतिरिक्त प्रतीक बब्बर, श्वेता बासु प्रसाद, आहाना कुमरा आणि प्रकाश बेलवाडी या कलाकारांनी काम केले आहे.