अभिनेत्री सई ताम्हणकर हिने तिच्या अभिनयाचा ठसा फक्त मराठी मनोरंजनसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्येही उमटवला आहे. क्रिती सॅनॉनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मिमी’ या चित्रपटात सईने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले. तिची ही भूमिका प्रचंड गाजली आणि फिल्मफेअरपर्यंतच्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांवर सईने आपले नाव कोरले. आता सई पुन्हा बॉलिवूडमध्ये कधी दिसणार याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले होते. तर सई लवकरच एका हिंदी चित्रपटात एका लोकप्रिय अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

आणखी वाचा : “‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा चांगला ट्रेंड…” ; विवेक अग्निहोत्रींनी साधला निशाणा

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Ramesh Bidhuri on Delhi CM Atishi
Ramesh Bidhuri : “दिल्लीच्या रस्त्यांवर हरिणीप्रमाणे…”, भाजपाच्या रमेश बिधुरींचं पुन्हा मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Madhuri Dixit Gauri Khan buy OYO shares
माधुरी दीक्षित व गौरी खानने शेअर मार्केटमध्ये केली गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले? वाचा
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल

‘मिमी’च्या यशानंतर सई पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये काम करत आपली छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसेल. तर लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. इम्रान, सई आणि चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या काश्मीरमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तेजस देवस्कर करत आहेत. या चित्रपटात इम्रान हाश्मी एका लष्कर अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सई ताम्हणकर या चित्रपटात हाश्मी हाश्मीच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले आहे. हा चित्रपट म्हणजे एक मिलिटरी ड्रामा आहे.

सई आणि इम्रानच्या व्यतिरिक्त अभिनेत्री झोया हुसैनदेखील यात महत्वाचा भाग असेल. या चित्रपटात सई आणि इम्रान रोमान्स करताना दिसणार आहेत. या फ्रेश जोडीबद्दल बोलताना, ई- टाइम्सच्या जवळच्या सूत्राने माहिती दिली की, “सई चित्रपटात इम्रानच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. दोन्ही स्टार्सची फ्रेश ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” या चित्रपटाच्या टीमने नुकतेच श्रीनगरमधून त्यांचे चित्रीकरण संपवले असून आता पहलगाममध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा : आठ वर्षांनी मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा दिग्दर्शिकेच्या भूमिकेत, महिला विशेष चित्रपटात झळकणार ‘हे’ कलाकार

दरम्यान मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या सईला चित्रपटांच्या अनेक ऑफर्स येत आहेत. सईकडे तिच्या आगामी चित्रपटांची मोठी यादी आहे. लवकरच ती मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाउन’मध्येही दिसणार आहे. तर सई ताम्हणकरने नुकतीच तिचा आगामी मराठी चित्रपट ‘फक्त महिलांसाठी’ची घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री – दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी करणार आहेत.

Story img Loader