गेल्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा ही चांगलीच चर्चेत आहे. या चर्चा तिच्या खासगी आयुष्यामुळे सुरु झाल्या होत्या. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिला अनेकदा ट्रोल करण्यात आले. तर द फॅमिली मॅन २ या वेबसिरीजमधील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीच पडली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे ती चर्चेत होती. मात्र आता समांथा एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली आहे. समांथाने सोशल मीडियाला रामराम केल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

समांथा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. विशेष म्हणजे पती नागाचैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतरही ती सोशल मीडियावर सक्रीय झाली होती. तिच्या विविध चित्रपटांच्या किंवा आगामी प्रोजेक्टबद्दल समांथा नेहमी पोस्ट करत असते. त्यासोबतच ती तिच्या फिटनेसचे अनेक व्हिडीओदेखील शेअर करताना दिसते. पण गेल्या १५ ते २० दिवसांपासून समांथा ही सोशल मीडियातून गायब झाली आहे. यामुळे तिने सोशल मीडियाला रामराम केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

“माझ्या वैवाहिक जीवनातील कटू अनुभव…”, समांथाने केला खासगी आयुष्याबद्दलचा मोठा खुलासा

इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असणाऱ्या समांथाने ३० जूननंतर तिच्या अकाऊंटवरुन एकही पोस्ट शेअर केलेली नाही. तसेच एखादी इन्स्टाग्राम स्टोरी देखील तिने शेअर केलेली नाही. तर दुसरीकडे समांथाने ट्विटरवर ५ जुलैला शेवटचे ट्वीट केले होते. त्यानंतर मात्र तिने काहीही पोस्ट केलेले नाही. तर तिच्या अधिकृत फेसबुकवर तिने ११ जूनला शेवटची पोस्ट केली होती.

त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून समांथाने सोशल मीडियावरुन काहीही पोस्ट केलेले नाही. त्यामुळे तिने सोशल मीडियावरुन एक्झिट घेतली का? त्याला रामराम केला का? असा प्रश्न तिच्या चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र अद्याप तिने यावर काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.

“मी तुम्हाला…”, समांथाने ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिले अनोखे चॅलेंज

समांथा लवकरच ‘यशोदा’, ‘अॅरेंजमेंट ऑफ लव्ह’ आणि ‘शकुंतलम’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. नागाचैतन्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नागाचैतन्य हा आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्यासोबत लाल सिंग चड्ढा या चित्रपटात झळकणार आहे.