स्वत:ची कार असावी असं अनेकांचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न करिअरच्या सुरूवातीस साकार होणं हे फार अवघड आहे. अभिनेत्री सानिका भोईटे हिने तिच्या मेहनतीच्या बळावर अवघ्या २२ व्या वर्षी तिच्या आयुष्यातील पहिली कार खरेदी केली आहे. सानिकाने गेल्यावर्षी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता, त्यात तिने आईला विचारलं, ‘आई तुला यावर्षी माझ्याकडून कायं हवं’. आईने सांगितलं, ‘तू एक ४ व्हिलर खरेदी कर’ आणि सानिकाने तिच्या आईचं स्वप्न त्याचवर्षाच्या अखेरीस पूर्ण केलं.

अभिनेत्री सानिका भोईटेने ‘पोरी तुझे नादान’, ‘भन्नाट पोरगी’, ‘हुरपरी’, ‘रूप साजरं’, ‘तुझी माझी यारी’, ‘साज तुझा’ अशा अनेक मराठी गाण्यांमध्ये अभिनय केला आहे. तिच्या गाण्यांना मिलीयन व्ह्यूज असतात. तिचे इंस्टाग्रामवर १० लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Tejashri Pradhan
तेजश्री प्रधानचा सिच्युएशनशिप, बेंचिंगबाबत तरुण पिढीला सल्ला; म्हणाली, “ज्या क्षणाला तुम्ही तुमचा आत्मसन्मान…”
Mukesh Ambanis daughter Isha Ambani spotted with colour-changing luxury SUV it is worth Rs 4 core
मुकेश अंबानींची मुलगी ईशा अंबानीकडे आहे सरड्यासारखी रंग बदलणारी कार! किंमत ऐकून बसेल धक्का….
Sridevi
श्रीदेवीला पाहताच विनोद खन्ना, ऋषी कपूर व इतर दिग्गज अभिनेत्यांनी केलेली ‘ही’ गोष्ट; प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणाले, “अचानक ते…”
Vanita Kharat
“माझा एक बॉयफ्रेंड होता…”, वनिता खरात ९०च्या दशकातील आवडत्या गाण्याचा किस्सा सांगत म्हणाली…
Tanvi Mundle
“तो असता तर आयुष्य…”, ‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री वडिलांबद्दल झाली व्यक्त, म्हणाली…

नवीन संसार अन् मालिकेचं शूट कसं सांभाळतेय सुरुची अडारकर; म्हणाली, “माझा नवरा पियुष…”

अभिनेत्री सानिका भोईटे तिच्या करिअरविषयी सांगते, “मी साताऱ्यातील फलटण या गावातून पुणे इथं शिक्षणासाठी एकटीच आले. पुण्यात मी सावित्रीबाई फुले विद्यापीठातून २०२२ मध्ये बॅचलर इन बिझनेस अ‍ॅडमिनीस्ट्रेशनचं माझं पदवी शिक्षण पूर्ण केलं आणि आता मी पुण्यातच राहते. माझं शिक्षण सुरू असताना मला ग्लॅमरस बॉलीवूड जगाची भुरळ पडली. मी वयाच्या १८ व्या वर्षापासून इन्स्टाग्रामवर अनेक मोठ्या ब्युटी ब्रँडसोबत कामं केली. शिवाय मी अनेक मराठी म्युझिक अल्बममध्ये देखील काम केले. त्यात सोशल मीडिया हे असं माध्यम आहे जिथे आपण आपल्यातील टॅलेंट लोकांपर्यंत सहज पोहोचवू शकतो. हा प्रवास सोप्पा नव्हता. भविष्यात संधी मिळाल्यास मला वेब सिरीजमध्ये काम करायला नक्की आवडेल.”

Story img Loader