अभिनेत्री सारा अली खान ही नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रवक्षकांच्या भेटीला येत असते. विनोदी भूमिका, रोमँटिक भूमिका यशस्वीरित्या केल्यानंतर ती आता एका स्वातंत्र्यसेनानीच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटासाठी सारा करण जोहरबरोबर काम करताना दिसणार आहे. ‘ए वतन…मेरे वतन’ असं या आगामी चित्रपटाचं नाव आहे. यापूर्वी सारा ‘अतरंगी रे’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. तरीही साराकडे नव्या चित्रपटांच्या ऑफर्सची कमतरता नाही. तिच्याकडे आधीपासूनच काही उत्तम प्रोजेक्ट्स आहेत आणि आता साराने अजून एका चित्रपटाला होकार दिला आहे. धर्मा प्रोडक्शनच्या या चित्रपटात सारा अली खान स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांची भूमिका साकारणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : अभिनेता पंकज त्रिपाठीची कौतुकास्पद कामगिरी, लावला पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हातभार

सारा तिच्या आगामी ‘ए वतन.. मेरे वतन’ या चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात येत्या सप्टेंबरमध्ये होणार असून सारा ह्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेताना दिसतेय. ही भूमिका वास्तववादी वाटावी असा तिचा प्रयत्न असेल. सध्या साराने इतर सर्व कामाच्या कमिटमेंट्स पूर्ण केल्याने आता तिने ‘ए वतन.. मेरे वतन’ या चित्रपटावर लक्ष केंद्रित केलं आहे. या भूमिकेसाठी ती भरपूर मेहनत घेत आहे. ‘ए वतन.. मेरे वतन’ या सिनेमाचं दिग्दर्शन कन्नन अय्यर यांचं असणार आहे.

हेही वाचा : सारा अली खान आणि जान्हवी कपूर दिसणार एकत्र, ‘या’ खास कारणासाठी शेअर केली स्क्रीन

हा चित्रपट १९४२ दरम्यान ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी उषा मेहता यांच्या अंडरग्राउंड रेडिओ स्टेशन ‘काँग्रेस रेडिओ’वर बेतलेला असेल. या रेडिओनं भारताच्या तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने सेन्सॉर केलेल्या बातम्या प्रसारित करून स्वातंत्र्यमोहिमेत मोलाचं योगदान केलं आहे. या चित्रपटाची प्रेक्षक वाट बघत असून हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होईल असे म्हटले जात आहे.