सध्या चित्रपटसृष्टीबद्दल अनेक उलटसुलट बातम्या येत असतात, चित्रपटसृष्टीत येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाबद्दल सगळेच कलाकार व्यक्त होत असतात. अभिनेत्री निर्माती सरगुन मेहताने चित्रपटसृष्टीतील अनुभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. इंडस्ट्रीमध्ये केवळ मुलगी आहे म्हणून कसे डावलले जाते यावर तिने भाष्य केले आहे. तिचा दिलजीत दोसाज अभिनित ‘बाबे भंगड़ा पौंदे’ हा पंजाबी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
सरगुनने एका मुलाखतीत सांगितले “एका महिला म्हणून या इंडस्ट्रीमध्ये काम करणं कठीण जात खासकरून जिथे पुरुषांची मक्तेदारी असते. तुम्हाला हल्ल्यात घेतले जाते. मी मात्र याकडे चांगल्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करते. काही लोकांना वाटत की मला फिरायला घेऊन गेलं तर मी पटेन मात्र मी माझ्या ज्ञानने त्यांच्यावर मात करते. तुम्हाला जे लोक हल्ल्यात घेतात त्यांना चांगला धडा शिकवा.”
सरगुन मेहता हे पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक मोठे नाव आहे. छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी, पंजाबी इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असलेली सरगुन मेहता तिच्या कामासाठी ओळखली जाते. सरगुनने हिंदी मालिका ‘उडियान’, ‘स्वरण घर’ आणि ‘बेबे भांगडा पंडे’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.