दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार अलीकडे बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहेत. विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना, समंथा यांसारख्या दाक्षिणात्य कलाकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता बॉलीवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपटांचा चाहतावर्ग वाढत चालला आहे. याविषयी ‘दृश्यम’ फेम अभिनेत्रीने आपले मत मांडले आहे.

हेही वाचा : “५०० कोटींच्या ‘आदिपुरुष’पेक्षा…” शाहरुख खानच्या ‘स्वदेस’मधील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, रामायणाशी आहे खास कनेक्शन

Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
Anupam Kher still lives in rented house
४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “कोणासाठी घ्यायचं?”
tharala tar mag sayali slaps priya watch promo
प्रियाला सणसणीत कानाखाली वाजवणार सायली! घटस्फोटाचं कारस्थान होणार उघड; दाखवला ‘तो’ पुरावा, पाहा जबरदस्त प्रोमो
vidya balan
“ही मुलगी पनवती…”, विद्या बालनने सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाली, “एका मल्याळम चित्रपटात…”

‘अमरउजाला’च्या संवाद कार्यक्रमात श्रिया सरनने हजेरी लावली होती. या वेळी श्रियाला दाक्षिणात्य चित्रपसृष्टी म्हणजेच साऊथ इंडस्टी आणि बॉलीवूड यामध्ये काय फरक आहे आणि साऊथ चित्रपट दिवसेंदिवस हिट होण्यामागे कारण काय? तू दोघांपैकी कोणाची निवड करशील, असा प्रश्न विचारण्यात आला. प्रश्नाला उत्तर देत श्रिया म्हणाली, “साऊथ असो किंवा बॉलीवूड माझे दोन्ही चित्रपट हिट झाले आहेत. आरआरआर आणि दृश्यम दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.”

हेही वाचा : ‘आदिपुरुष’नंतर क्रिती सेनॉन दिसणार रोमॅंटिक भूमिकेत, ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर शेअर करणार स्क्रीन

श्रिया पुढे म्हणाली, “मला वाटते की चित्रपटाचे कथानक जास्त महत्त्वाचे असते. चांगल्या कथांना प्रेक्षक पसंती देतात आणि चित्रपटगृहांमध्ये जाऊन सिनेमे पाहतात. आता निर्माते आणि दिग्दर्शकांना हे कळले पाहिजे की, कितीही मोठा स्टार असो चित्रपट हा कथेच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर चालतो. कोरोनानंतर परिस्थिती बदलली असून आता कलाकार एखाद्या चित्रपटाची निवड करताना सर्वात आधी स्क्रिप्ट आवर्जून पाहतात. आपण सतत नवनवे प्रयत्न करणे आवश्यक असते.”

हेही वाचा : Video : करण देओलच्या रिसेप्शनमध्ये रणवीर-दीपिकाने केला जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, अभिनेत्री श्रिया सरनने ‘दृश्यम’ चित्रपटात अजय देवगणच्या बायकोची भूमिका साकारली होती. ‘दृश्यम’ चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.