सध्या पाहायला गेलं तर अनेक स्टार किड्स त्यांच्या आई-वडिलांपेक्षा जास्त चर्चेत असतात. यामध्येच एक नाव घ्यायचं झालं तर अभिनेत्री श्रुती हासन. कमल हासन यांची लेक असलेल्या श्रुतीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्तेत असते. मध्यंतरी श्रुतीने ‘फीट अप विथ स्टार्स’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या जीवनाशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा असून ती व्यसनाच्या आहारी गेल्याचंही सांगितलं.
श्रुतीने फीट अप विथ स्टार्स या कार्यक्रमात हजेरी लावली होती. विशेष म्हणजे प्रियकर मायकल कोरासलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती पहिल्यांदाच मोकळेपणाने याविषयावर व्यक्त झाली. त्याचवेळी ती दारुच्या आहारी गेल्याचं स्पष्ट केलं.

“मायकलसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी व्हिस्कीच्या प्रचंड आहारी गेले होते. त्यामुळे त्याचा परिणाम माझ्या करिअरवरही होऊ लागला होता. हे व्यसन नंतर इतकं वाढलं की मला अभिनयातून ब्रेक घ्यावा लागला होता. मात्र यातून मी स्वत:ला सावरलं आणि आता मी पूर्णपणे व्यसनमुक्त झाले आहे”, असं श्रुतीने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

aw

A post shared by Shruti Haasan FC (@shruti.haasan) on

पुढे ती ब्रेकअपबद्दल म्हणते, “दारुच्या आहारी गेल्यामुळे मी काही दिवस आजारीही होते. माझी तब्येत बिघडली होती. तसंच माझा ब्रेकअप झाला परंतु तो माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. त्यातून मी खूप काही शिकले”.

वाचा : Grammy Awards 2020 : ‘देसीगर्ल’चा तडका

दरम्यान, श्रुती टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने बॉलिवूडमध्येदेखील काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. गब्बर इज बॅक, वेलकम बॅक, रॉकी हॅण्डसम या हिंदी चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

Story img Loader