जगप्रसिद्ध अभिनेत्री-गायिका जेनिफर लोपेझ (Jennifer Lopez) तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. ५२ वर्षीय जेनिफर गेल्या काही वर्षांपासून सुप्रसिद्ध अभिनेता बेन अफ्लेकला (Ben Affleck) डेट करत होती. आता या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. जेनिफर-बेन विवाहबंधनात अडकले आहेत. अमेरिका येथील लास वेगासमध्ये या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. जेनिफरचा वेडिंग लूकमधील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – कोणत्या दोन सख्ख्या भावांना डेट करत होत्या जान्हवी-सारा? करण जोहरचा मोठा खुलासा

जेनिफर-बेनने २००२मध्ये साखरपुडा केला. पण एका वर्षामध्येच दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला. त्यानंतर जेनिफर-बेनने वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न केलं. संसार थाटला. पण गेल्या वर्षी पुन्हा एकदा दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. त्यादरम्यान दोघांनी एप्रिलमध्ये पुन्हा साखरपुडा केला. अखेरीस जेनिफर-बेनने लग्न केलं आहे. जेनिफरचा जवळचा हेअरस्टायलिस्ट क्रिस एपलटाउनने व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

क्रिसने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जेनिफरने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केलेला दिसत आहे. “कोणीतरी लग्न करत आहे” असं क्रिस या व्हिडीओमध्ये हसत म्हणाला आहे. क्रिसने हा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं की, “लग्नाआधी शेवटच्या मिनिटांमधील काही क्षण आणि भावना” काही तासांमध्येच हजारो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – “करण जोहरने मला श्रेय दिलं नाही”, ‘कॉफी विथ करण ७’शोवर लेखिकेचा आरोप

काही जणांनी जेनिफरच्या साध्या वेडिंग ड्रेसबाबत कमेंट केली आहे. तर काहींनी या वयामध्ये ती पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडबरोबर लग्न करत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पाहा व्हिडीओ –

द लॉस एंजिल्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जेनिफरने आपलं नाव बदलून जेनिफर एफ्लेक केलं आहे. शनिवारी (१६ जुलै) रात्री या जेनिफर-बेनने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.