मराठी चित्रपटसृ्ष्टीमधील प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या (Ketaki Mategaonkar) चुलत भावाचं दोन आठवड्यापूर्वी निधन झालं. पुण्यातील सुसगाव येथे राहत असलेल्या २१ वर्षीय अक्षय माटेगावकरने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे माटेगावकर कुटुंबियांवर शोककळा पसरली. त्यांना मोठा दुःखद धक्का बसला. केतकीचं आपल्या भावावर प्रचंड प्रेम होतं. आता दोन आठवड्यानंतर केतकीने भावासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे. तसेच अक्षयबरोबरचे काही फोटो देखील तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. 

आणखी वाचा – “नगरविकास शिवाय मुख्यमंत्री म्हणजे…” सयाजी शिंदेंनी शेअर केलेला ‘मी पुन्हा येईन’चा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
actress Sapna Singh teen son found dead in UP (1)
मित्रांबरोबर गेला, दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी अंत
Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

केतकीने तिच्या पोस्टच्या माध्यमातून भाऊ अक्षयबरोबरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच तो आपल्यासाठी किती प्रिय होता? हे देखील केतकीने सांगितलं आहे. केतकी म्हणाली, “माझी अक्षु, माझा छोटासा गोड अक्षु, तुझ्यासारखा अत्यंत सुस्वभावी, समंजस, प्रचंड हुशार, मेहनती आणि गोड भाऊ मला मिळाला. आता काय लिहू, लिहू की नको लिहू…२१ वर्षाच्या आठवणी शब्दात कशा लिहू? हाच विचार करतेय. गेल्या काही दिवसांपासून माझ्या दिवसाची सुरुवातच तुझ्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणांपासून होते. मला हे क्षण माझ्यापासून कधीच लांब करायचे नाहीत. किती आणि केवढ्या आठवणी आहेत.”

पुढे बोलताना ती म्हणाली, “अभ्यास झाला की सगळं बाजूला ठेवून रियाझामध्ये हरवून जाणारा अक्षु. गजल, ठुमरी तर कधी हरिहरन, पिंक फ्लॉइड ऐकणारा अक्षु. भारतीय शास्त्रीय संगीत तर कधी फुटबॉलमधलं ज्ञान आत्मसात करणारा अक्षु. असा अक्षु मला सोडून गेला.” केतकीने अशा अनेक आठवणी तिच्या पोस्टच्या माध्यमातून सांगितल्या आहेत. 

आणखी वाचा – वाघाची डरकाळी, रिक्षाचा हॉर्न अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संबंध काय? दिग्दर्शक रवी जाधव म्हणतात…

आयुष्यभर आपला भाऊ आपल्याबरोबर असल्याची जाणीव राहिल असेही केतकीने यावेळी म्हटलं आहे. आजही केतकी सकाळी उठली की भाऊ अक्षय आपल्याबरोबर आहे असं तिला वाटतं. पण लगेचच सत्य परिस्थिती डोळ्यासमोर उभी राहते. केतकीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. तसेच तिची ही पोस्ट पाहून अनेकांनी केतकीच्या भावाला श्रद्धांजली वाहिली आहे. 

Story img Loader