अभिनेत्री स्मिता गोंदकर ही तिच्या ग्लॅमरस आणि बिनधास्त अंदाजामुळे कायम चर्चेत असते. मराठी ‘बिग बॉस’मुळे स्मिता खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली. मात्र तिचे ‘पप्पी दे पारुला’ हे गाणे सुपरहिट ठरले होते. या गाण्यात तिचा बोल्ड अंदाज दिसला होता. या गाण्याने तिला वेगळी ओळख मिळाली होती. याबद्दल तिने फिल्मफेअरशी बोलताना खुलासा केला आहे.
स्मिता गोंदकरने पप्पी दे पारूला गाण्याची आठवण सांगताना असं म्हणाली की, “मी एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दुबईला गेले होते. तेव्हा तिथे विमानतळावरील शॉपिंग सेंटरमध्ये गेले असताना पप्पी दे पारूला हे गाणे वाजले, आधी वेगळे गाणे चालू होते ते संपल्यानंतर माझे गाणे त्यांनी लावले, कदाचित त्यांनी मला ओळखले असेल म्हणून त्यांनी हे गाणे लावले असेल,” अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. ती पुढे म्हणाली “आजही अनेक ठिकाणी हे गाणे वाजत असते.”
स्मिताने मॉडेलिंगच्या बरोबरीने वैविध्यपूर्ण अशा भूमिका केल्या आहेत. ‘मुंबईचा डबेवाला’ या मराठी चित्रपटातून तिने पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने ‘क्रांतिवीर’, ‘विजय दीनानाथ चौहान’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘जस्ट गम्मत’, ‘येरे येरे पैसा २’ यांसारख्या मराठी चित्रपटात तिने काम केले आहे.