मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या मराठमोळ्या दिग्दर्शकांचा बोलबाला आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ या हिंदी चित्रपटाने शंभर कोटी पार झेप घेत कमाई केल्यानंतर तर ही चर्चा अधिकच वाढली आहे. आदित्यच्या ‘काकुडा’ या दुसऱ्या हिंदी विनोदी भयपटातून प्रेक्षकांसमोर आलेल्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही आपल्या मराठी दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे. सोनाक्षीने याआधी कधीच विनोदी भयपटात काम केले नव्हते. तिने आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘झोंबिवली’ हा मराठी चित्रपट पाहिला होता. हा चित्रपट आवडल्यानेच त्याच्याबरोबर काम करायची इच्छा असलेल्या सोनाक्षीने ‘काकुडा’ चित्रपटासाठी होकार दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘बाई गं’ सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, Swapnil Joshi च्या चित्रपटाने कमावले फक्त ‘इतके’ लाख

‘काकुडा’ या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुखबरोबर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तिने याआधी कधीही भयपटात काम केलेले नाही, विनोदी भयपटातही काम केलेले नाही. मुळात मला भयपट पाहायलाच फारसे आवडत नाही. मला उलट झोंबी चित्रपट खूप आवडतात. त्यामुळे विनोदी भयपटात काम करणे कसे जमेल? अशीच शंका माझ्या मनात होती, असे सोनाक्षीने सांगितले. त्यात झोंबीचे कथानक असलेला आदित्यचा ‘झोंबिवली’ हा मराठी चित्रपट तिने पाहिला. मला ‘झोंबिवली’ चित्रपट खूप आवडला होता. त्यामुळे आदित्यच्या दिग्दर्शनाखाली काम करायची इच्छा होतीच. मी जेव्हा ‘काकुडा’ची कथा वाचली तेव्हा ती वाचतानाच मला खूप मजा वाटत होती. भयपटाला विनोदाची जोड देत ती कथा रंगवली होती. त्यामुळे हा प्रकार नवीन असल्याने मला त्यात रस वाटला. सगळ्या गोष्टी उत्तम जुळून आल्या आणि म्हणून मी ‘काकुडा’ चित्रपटासाठी होकार दिला, असे तिने सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sonakshi sinha praise munjya director aditya sarpotdar zws