मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तमाशा लाईव्ह’ असे तिच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातील रंग लागला हे गाणे सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. या गाण्यावर अनेक कलाकार, नेटकरी रिल्स बनवताना दिसत आहे. नुकतंच सोनाली कुलकर्णी हिने लंडनच्या टॉवर ब्रिजवर रंग लागला या गाण्यावर रिल बनवले आहे. सध्या तिचा हा रिल व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोनाली कुलकर्णीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिचा आगामी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’मधील रंग लागला या गाण्यावर नाचताना दिसत आहे. यात तिच्यासोबत प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकरही नाचताना दिसत आहे. या दोघीही सध्या लंडनमध्ये आहे. त्या दोघीही लंडनच्या प्रसिद्ध टॉवर ब्रीजवर नाचताना दिसत आहे.

सोनालीने स्वत: तिचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. “लंडनच्या टॉवर ब्रीजवर फुलवा खामकरसोबतची काही वेगळीच जादू. धन्यवाद युगेशा ओमकार हे इतक्या संयमाने आणि सुंदरपणे टिपल्याबद्दल” असे सोनालीने कुलकर्णीने म्हटले आहे.

दरम्यान बातमीची वारी, फड लागलाय, वाघ आला, लाथ घालणार, रंग लागला, कडकलक्ष्मी, गरमा गरम घ्या, झुंज लागली, वासुदेव, जाऊ कशी माघारी, जखम जहरी, गंमत गड्या अशा अनेक गाण्यांची सांगीतिक मैफल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमितराज आणि पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या गाण्यांचे बोल क्षितीज पटवर्धन यांचे आहेत. हे श्रवणीय संगीत चित्रपटाच्या कथेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारे आहे. प्रत्येक पात्राची ओळख ही गाण्याच्या माध्यमातून होत असून अशा प्रकारचा प्रयोग मराठी चित्रपटात पहिल्यांदाच होत आहे.

मुख्य म्हणजे सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील हे पहिल्यांदा ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच गायले आहेत. प्रेक्षकांना चित्रपटात काही विशिष्ट शैलीची गाणी ऐकायला मिळणार आहेत. रॅप, रोमँटिक असे गाण्यांचे विविध प्रकार यात असून नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केले आहे.

प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत याने या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.