मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार सुरू होती. अखेर प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सोनालीचा हा विवाहसोहळा ३ भागांच्या मालिकेच्या स्वरुपात प्रसारित करण्यात आला. सोनाली आणि कुणाल यांनी २०२१ मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं. पण त्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने विधीवत लग्नगाठ बांधली. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोनाली तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुकताच सोनालीने तिच्या नवऱ्याच्या उखाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
सोनालीच्या लग्न सोहळ्याच्या व्हिडीओंची मालिका नुकतीच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. याचे काही व्हिडीओ सोनालीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. नुकतंच सोनालीने कुणालचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कुणालने तिच्यासाठी खास उखाणा घेतला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
“काय झालं, कसं झालं, सगळं लवकरच शेअर करु…”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पुन्हा अडकली विवाहबंधनात
या व्हिडीओची सुरुवात सोनालीच्या गृहप्रवेशाने होते. यात ती तांदळाने भरलेला कलश ओलांडून घरात प्रवेश करते. त्यानंतर सर्वजण तिचा नवरा कुणालला एक उखाणा घेण्यासाठी सांगतात. त्यानंतर तो सोनालीसाठी खास नाव घेतो. ‘लग्न झालं दणक्यात, लग्नात होता ढोला-बाजा, सोनालीचं नाव घेतो…मै झुकेगा नही साला’ असे हटके नाव घेतो. त्याच्या या नावावरुन त्यालाही अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाची भूरळ पडल्याचे दिसत आहे.
दरम्यान सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर ७ मे २०२१ रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते. यानंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी त्या दोघांनी पुन्हा एकदा थाटामाटात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने पती कुणाल बेनोडेकरसोबत पुन्हा लगीनगाठ बांधली.
“राखून ठेवलेले हे क्षण…” अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने शेअर केला लग्नाचा पहिला फोटो
अगदी मोजक्याच नातेवाईक, मित्रपरिवारासोबत सोनाली -कुणालचा लग्नसमारंभ पार पडला होता. मात्र त्याचे फोटो, व्हिडीओ कुठेच झळकले नव्हते. त्यामुळे सोनालीचे लग्न कसे झाले, हे जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती आणि म्हणूनच चाहत्यांची ही इच्छा ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटीने पूर्ण केली आहे. सोनाली आणि कुणालचा हा अविस्मरणीय सोहळा चाहत्यांना अनुभवता आला. विशेष म्हणजे एखाद्या अभिनेत्रीचा लग्नसोहळा वेबविश्वात प्रसारित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.