मराठमोळी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मात्र सोनालीने यावेळी सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना एक अवाहान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनाली कुलकर्णीने  इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या आई वडिलांचा एक फोटो शेअर केला आहे. लसीकरण केंद्रावरील हा फोटो शेअर करत तिने आई वडिलांनी लस घेतल्याचं सांगितलं आहे. तसचं ती कॅप्शन मध्ये म्हणाली आहे, “माझ्या आई बाबांचं लसीकरण झालंय..लॉकडाउन होईल किंवा होणारही नाही,ते आपल्या हातात नाही. पण आपली सुरक्षितता ही केवळ आपली जबाबदारी आहे. काळजी घेऊयात, आपली आणि आपल्या कुटुंबाची ” असं म्हणत तिने सर्वांना काळजी घेण्यास सांगितलं आहे.

तर सोनालीने आता सर्वांना लस उपलब्ध व्हावी यासाठी विनंती केली आहे. “P.S. आता लसीकरण सरसकट सगळ्यांसाठी सुरू व्हायला हवं हीच विनंती. ” असं तिने कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. लसीकरण सुरू झालं असलं तरी वाढत्या रुग्णांचा आकडा पाहता मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत. तर बॉलिवूडसोबत मराठी सिनेसृष्टीतही काही कलाकारांना करोनाची लागण झाली. उमेश कामतनंतर अभिनेता दिग्दर्शक प्रियदर्शन जाधवला सोमवारी करोनाची लागण झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.