अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तुर्की दौऱ्यावर आहे. वाढदिवसानिमित्त सोनालीने नवऱ्याबरोबर तुर्की ट्रिपचे नियोजन केले होते. गेले महिनाभर सोशल मीडियावर तुर्कीमधील सुंदर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांचे मनोरंजन करीत आहे, परंतु या सगळ्यात सोनालीने साडी नेसून पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा सुरु आहे.
हेही वाचा : “बाळा, तू मला वचन दे” लेकाच्या वाढदिवशी जिनिलीयाने शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली “तुला आता आई-बाबांची गरज…”
मराठी चित्रपटसृष्टीच्या अप्सरेने अलीकडेच तुर्कीतील लोकप्रिय ‘बलून कॅपाडोसिया’ या जागेला भेट दिली. अभिनेत्रीने याचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तुर्कीमध्ये जाऊन फ्रॉक, गाऊन घालण्यापेक्षा सोनालीने साडी नेसण्याला प्राधान्य देत हटके फोटोशूट केले आहे. ‘बलून कॅपाडोसिया’ या सुंदर जागी भेट देताना साडी का नेसली? याबाबत तिने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करीत खुलासा केला आहे.
हेही वाचा : ‘जरा हटके जरा बचके’साठी सारा अली खानची निवड का केली? दिग्दर्शक म्हणाले, “एक देसी अंदाज…”
सोनाली लिहिते, “‘बलून कॅपाडोसिया’ ही जागा फोटोशूटसाठी खूप लोकप्रिय आहे. जगभरातून असंख्य लोक इथे खास फोटो काढण्यासाठी येतात. मॉडेल्स, नववधू त्यांच्या फोटोशूटसाठी, विंटेज कार आणि फ्लोइंग गाऊन भाड्याने घेतात. मी सुद्धा या जागेला भेट देत सुंदर फोटो काढले आहेत. याठिकाणी मी आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करणारी साडी नेसली होती. अनेक लोक इथे आल्यावर लांब ड्रेस घालतात परंतु, माझ्याकडे फोटोशूट करताना ड्रेसच्या लांब ट्रेलऐवजी साडीचा हा लांब पदर होता.”
हेही वाचा : क्रिती सेनॉनने पाहिला रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट; पोस्ट करत म्हणाली, “मला उशीर झाला, पण…”
सोनालीची पोस्ट आणि त्यावरील कॅप्शन वाचून चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. एका युजरने “फोटोशूट खूपच अप्रतिम आहे आणि तुला साडी नेसून भारतीय संस्कृती जपताना पाहून खूप भारी वाटले…” तर अनेकांनी “तू खूप सुंदर दिसत आहेस” अशा कमेंट्स सोनालीने शेअर केलेल्या पोस्टवर केल्या आहेत.