मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तमाशा लाईव्ह’ असे तिच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटातील रंग लागला हे गाणे सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. त्यासोबतच तिच्यावर चित्रीत झालेली गरमा गरम, कडक लक्ष्मी ही गाणी देखील हिट ठरताना दिसत आहे. नुकतंच सोनाली कुलकर्णीने याबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अक्षय बर्दापूरकर निर्मित, संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट म्हणजे एक सांगितिक नजराणा आहे.‘तमाशा लाईव्ह’ची ही म्युझिकल ट्रीट येत्या १५ जुलैपासून संगीतप्रेमींसाठी सादर होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे आगाऊ बुकींग सुरु झाले आहे. यानिमित्ताने सोनाली कुलकर्णीने एक पोस्ट शेअर केली आहे.

सोनाली कुलकर्णीने लंडनच्या टॉवर ब्रीजवर केला गरबा, व्हिडीओ व्हायरल

सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तमाशा लाईव्हचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील हे कलाकार पाहायला मिळत आहे. “हीच ती वेळ, हाच तो क्षण, ‘तमाशा LIVE’ ची Advance Booking सुरु !”, असे सोनाली कुलकर्णीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. तिचे हे कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटातील ‘फड लागलाय’ गाणे प्रदर्शित, सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवीची धमाल पाहिलात का?

दरम्यान प्लॅनेट मराठी, माऊली प्रॉडक्शन, एटीएट पिक्चर्स प्रस्तुत याने या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे. सौम्या विळेकर, डॉ. मनीषा तोलमारे, समीर केळकर, अजय उपर्वात सहनिर्मित या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader