बॉलिवूडमध्ये आजच्या घडीला अनेक अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. मात्र या अभिनेत्रींच्या गर्दीत अजूनही ९० च्या दशकातील काही अभिनेत्री त्यांचं स्थान भक्कम ठेवून आहेत. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे सोनाली बेंद्रे. ९० च्या काळात आपल्या आरस्पानी सौंदर्य आणि मनमोहक हास्य यांच्या जोरावर सोनालीने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. त्यामुळे आजही ही अभिनेत्री अनेकांचं क्रश असल्याचं पाहायला मिळतं. अलिकडेच सोनालीने तिचा एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. विशेष म्हणजे हा फोटो सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येक जण लॉकडाउन असल्यामुळे घरात आहे. या काळात अनेकांनी त्यांचे थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. यात सेलिब्रिटींचाही समावेश आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनेक कलाकारांनी त्यांचे थ्रोबॅक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात सोनाली बेंद्रेनेदेखील तिचा जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनाली बिकिनीमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे हा फोटो चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा