अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली. त्यानंतर ती पुन्हा नव्या जोमाने कामाला लागली आहे. नव्वदच्या दशकामध्ये सोनालीने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. पण त्याकाळात बॉलिवूडमध्ये नेमकी काय परिस्थिती होती? याबाबत तिने मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये सोनालीने बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्यामध्ये काय कनेक्शन होतं? तसेच बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड डॉनचं वर्चस्व असल्याचं स्पष्टपणे सांगितलं आहे.

आणखी वाचा – “सोयीनं कसं जातीवर घेता तुम्ही?”; जातीयवादी पोस्ट करू नका असा सल्ला देणाऱ्याला किरण मानेंचं सडेतोड उत्तर

नेमकं काय म्हणाली सोनाली बेंद्रे?
‘द रणवीर शो’ या पॉडकास्ट कार्यक्रमामध्ये सोनालीने हजेरी लावली होती. यावेळी ती बॉलिवूडमधील अनेक विषयांवर स्पष्टपणे बोलताना दिसली. “नव्वदच्या दशकामध्ये बॉलिवूड दिग्दर्शक अंडरवर्ल्ड डॉन यांच्या दबावाखाली काम करायचे. दिग्दर्शकांनाही अशा परिस्थितीमध्ये कोणतीच मदत करणं शक्य नव्हतं. काही चित्रपटांमधून मलाही काढता पाय घ्यावा लागला. शिवाय त्यावेळी वेगळ्या मार्गांनी बॉलिवूड चित्रपटांसाठी पैसे यायचे.” असं सोनालीने यावेळी सांगितलं.

पतीची मिळाली साथ
सोनाली पुढे बोलताना म्हणाली, “चित्रपट निर्मात्याच्या प्रत्येक खेळीपासून मला लांब राहायचं होतं. यामध्ये मी यशस्वी सुद्धा झाले. यादरम्यान माझे पती गोल्डी बहल यांनी माझी खूप मदत केली. कोणत्या चित्रपटाची निर्मिती कोण करत आहे? कोणत्या चित्रपटामागे अंडरवर्ल्ड डॉनचे पैसे नाहीत? याबाबत गोल्डी मला माहिती द्यायचे.”

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा – Boyz 3 Teaser : पुन्हा एकदा तुफान राडा, ‘बॉईज ३’चा धमाकेदार टीझर पाहिलात का?

इतकंच नव्हे तर सोनालीला काही कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. “अंडरवर्ल्ड डॉन यांच्या दबावामुळे मला अनेक चित्रपटांमधून बाहेर काढण्यात आलं. या चित्रपटाची भूमिका आता आपल्या हाती येणार असं मला वाटायचं. पण अचानकच त्या भूमिकेसाठी कोणत्या दुसऱ्या अभिनेत्रीची निवड करण्यात यायची. याबाबत काहीच बोलू नको म्हणून सहकलाकार आणि दिग्दर्शकांचा माझ्यावर दबाव असायचा.” सोनालीने या मुलाखतीच्या माध्यमातून बॉलिवूडमधील तेव्हाची सत्य परिस्थिती सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

Story img Loader