मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री सोनाली खरेचं नाव आवर्जून घेतलं जातं. सोनालीने मराठी मालिका, चित्रपट करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मातृदिनाच्या निमित्ताने तिने तिच्या एका मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने तिने निर्मितीत पाऊल टाकले आहे. सोनालीने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची सुरुवात केली आहे. या प्रॉडक्शन अंतर्गत तिने ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती.

आणखी वाचा : अभिनेत्री मुक्ता बर्वेचे रंगभूमीवर पुनरागमन, केली नव्या नाटकाची घोषणा

नुकतेच ‘मायलेक’ या चित्रपटाच्या शूटिंगला लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. सोनाली खरेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. विशेष म्हणजे ‘मायलेक’ चित्रपटाद्वारे सोनालीची मुलगी सुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सोनाली आणि सनाया या मायलेकींचीच जोडी मुख्य भूमिकेत दिसणार असून सनाया आनंद ही सोनालीची मुलगी मायलेक चित्रपटात तिच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. आई-मुलीचं सुंदर नातं दाखवण्याचा प्रयत्न सोनाली या चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहे.

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’साठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट, म्हणाली “मी कायम तुमची…”

या चित्रपटात अभिनेता उमेश कामत महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्याबरोबरच अभिनेते संजय मोने ही चित्रपटात दिसणार आहेत. प्रियांका तन्वर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात उमेश कामत याची भूमिका काय असेल हा अजून स्पष्ट झालं नाहीये. तरी येणाऱ्या वर्षात हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Story img Loader