एका अभिनेत्रीने रस्त्यावर चांगलाच राडा घातला आहे. या प्रकरणात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी या अभिनेत्री विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीने रस्त्यात घातलेल्या गोंधळामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं?

तेलगू अभिनेत्री सौम्या जानूने हा राडा घातला आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तिने कर्तव्यावर असलेल्या ट्र्रॅफिक होमगार्डला मारहाण केली. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. हैदराबादच्या बंजारा हिल्स भागातली ही घटना आहे.रविवारी म्हणजेच २५ फेब्रुवारीला ही घटना घडली आहे. बंजारा हिल्समध्ये चुकीच्या मार्गाने आपली जॅग्वार कार चालवत असलेल्या अभिनेत्री सौम्याला ट्रॅफिक होमगार्डने अडवलं. त्यावेळी होमगार्डला सहकार्य करण्याऐवजी सौम्या चांगलीच भडकली. तिने गार्डला शिवीगाळ केली आणि मारहाण केली असा आरोप तिच्यावर होतो आहे. व्हायरल व्हिडीओतही हे दिसतं आहे.

सौम्याने गार्डचे कपडे फाडले…

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इतरांनी मध्यस्थी करूनही अभिनेत्री संतापलेलीच होती. रस्त्यावर आरडाओरड सुरू होता. ट्राफिक होमगार्डने तिने हल्ला केला. त्याचा युनिफॉर्मही फाडला. या घटनेचा व्हिडीओ तयार करणाऱ्या लोकांवर तिने हल्ल्याचा प्रयत्न केला.

घटनेनंतर ट्राफिक होमगार्डने बंजारा हिल्स पोलीस ठाण्यात तक्रार केली. पुरावा म्हणून त्याने पोलिसांमध्ये व्हिडीओदेखील सोपवले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.