गेल्या आठवड्यापासून स्पृहा जोशी आपल्या चाहत्यांसाठी एक सरप्राइज घेऊन येणार असल्याची चर्चा रंगली होती. पण, हे सरप्राइज नक्की काय असणार याची कल्पनादेखील कोणालाचं नव्हती. अखेर स्पृहाने तिच्या सरप्राइजवरून पडदा काढला आहे.
मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी स्पृहा आता ‘किचनची सुपरस्टार’ या कार्यक्रमातून सर्वांच्या भेटीला येत आहे. हा कार्यक्रम स्टार प्रवाह वाहिनीवर सोमवार ते शनिवार दुपारी १ वाजता प्रसारित होईल. अभिनेत्री, कवयित्री, निवेदीका म्हणून समोर आलेली स्पृहा आता चाहत्यांना ‘शेफ’च्या भूमिकेत दिसणार आहे.
स्पृहाच्या खुमासदार सूत्रसंचलनासह या कार्यक्रमात सून आणि मुली त्यांच्या कुटुंबासाठी खास पदार्थ करणार असून, त्यांच्यामध्ये स्पर्धा रंगताना दिसतील. तसेच, यात अव्वल शेफच्या महत्त्वपूर्ण डाएट टिप्सही दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्राची खाद्य परंपरा आणि प्रत्येक प्रांतातील भोजनाच्या सर्वोत्कृष्ट जागांची माहिती यातून दिली जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress spruha joshi gears up for her new show