छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत स्पृहा जोशी हे नाव कायमच पाहायला मिळते. एक उत्तम अभिनेत्री आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून तिला ओळखली जाते. स्पृहाने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. यामुळे घराघरात तिला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. स्पृहाचा पती वरद लघाटे याचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली आहे.   

स्पृहा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट शेअर करत असते. स्पृहा जोशीचा पती वरदचा आज वाढदिवस असतो. या निमित्ताने तिने इन्स्टाग्रामवर तिचे पतीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोबरोबरच तिने तिच्या नवऱ्यासाठी खास पोस्टही लिहिली आहे.
आणखी वाचा : अभिनेत्री स्पृहा जोशीने सांगितला लग्नापूर्वीचा किस्सा, म्हणाली “आम्हाला जबरदस्ती एका…”

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”

स्पृहा जोशीची पोस्ट

“पहिली भेट ही कायमच महत्त्वाची असते.

मी माझ्या पतीला पहिल्यांदा भेटले तेव्हा तो कॉलेजमध्ये लोकसत्ता या मराठी वृत्तपत्राचा कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम करत होता. तो माझ्या टीममधील वरिष्ठांपैकी एक होता. त्यानंतर आम्ही दोघांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात इंटर्नशिप केली. ज्यात तो आमच्या टीमचा प्रमुख म्हणून काम करत होता.

आम्ही दोघांनी भाषा आणि इतर अनेक मुद्द्यांवर एकमेकांबद्दल काही मत बनवली होती. त्यानंतर एकदा याच वृत्तपत्रातील एका मोहिमेदरम्यान मी अँकर केलं होतं. त्यावेळी आमच्या असे लक्षात आले की, आम्ही एकमेकांबद्दल जितका वाईट विचार करतोय, तितके वाईट आम्ही नाही.

यानंतर मग जसं म्हणतात तसं… पुढे सर्व काही आनंदात झाले.

वरद तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा,  तुझ्या पहिल्या भेटीपासून ते आयुष्यभर कायमची छाप पाडण्यापर्यंत…”, असे स्पृहा जोशीने म्हटले आहे.

आणखी वाचा : “तो पैशासाठी गेला…” ओंकार भोजनेच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मागील एक्झिटचं खरं कारण समोर

दरम्यान स्पृहा आणि वरद यांच्या लग्नाला १३ वर्षे उलटली आहेत. २०१४ मध्ये त्या दोघांनी लगीनगाठ बांधली. ते दोघेही ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांचा विवाह सोहळा २८ नोव्हेंबर २०१४ रोजी पार पडला होता. वरदने त्याची कारकिर्द पत्रकार म्हणून सुरु केली होती. मराठीतीत एका नामांकित वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित होता. पण त्यानंतर त्याने पत्रकारितेचे क्षेत्र सोडून मार्केटिंग क्षेत्राची वाट धरली आहे. 

Story img Loader