सध्या सोशल मीडियावर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला ‘Ashab Wala Aaz’ हा चित्रपट चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा पहिला अरबी चित्रपट आहे. या चित्रपटावरून अरब आणि इजिप्त देशांमध्ये मोठा वाद झाला आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेले काही सीन पाहिल्यानंतर या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी काही प्रेक्षकांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अशब वाला आज’ हा चित्रपट ‘Perfect Strangers’ या इटालीयन चित्रपटाचा अरब रिमेक आहे. या चित्रपटातील एका दृश्यात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री तिची अंतर्वस्त्र काढताना दाखवण्यात आली आहे. हे पाहिल्यानंतर मुस्लिम देशांमधले प्रेक्षक संतापले आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून अरब समाजाला भ्रष्ट करण्याचा तसेच अरब देशांच्या संस्कृतीवर निशाना साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे तिथल्या लोकांचे म्हणणे आहे.

इजिप्तमध्ये या सीनवर तीव्र आक्षेप घेतला जात आहे, कारण मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री मोना झाकी ही इजिप्तच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिथल्या लोकांचा असा विश्वास आहे की, तिच्यासारखी मोठी अभिनेत्री असा सीन कसा करू शकते? एवढंच काय तर चित्रपट समीक्षकांनी तिच्यावर आक्षेप घेतला आहे. समीक्षकांचे म्हणणे आहे की हा चित्रपट समलैंगिकतेला प्रोत्साहन देतो. समलैंगिकतेला प्रोत्साहन देणे म्हणजे, इजिप्शियन समाजातील नैतिकता आणि कौटुंबिक मूल्यांवर हा हल्ला आहे.

आणखी वाचा : “उद्धवदादा तुम्ही बाळासाहेबांचे…”, वाइन विक्रीवरून बिचुकलेचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

‘अशब वाला आज’ हा चित्रपट अनेक आंतराष्ट्रीय भाषांमध्ये डब केला आहे. मुस्लिम देशांमध्ये या चित्रपटावरून विरोध होत आहे. त्यात सगळ्यात जास्त विरोध हा इजिप्त देशातून होत आहे.

आणखी वाचा : “मुलगी आणि पत्नीसोबत पाहू शकत नाही असा चित्रपट…”, अल्लू अर्जुनचं वक्तव्य चर्चेत

या चित्रपटात एका दृश्यामध्ये तुला तुझ्या प्रियकरासोबत सेक्स करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे, असा संवाद बापाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीच्या तोंडी मुलीशी चर्चा करताना दाखवण्यात आलाय. चित्रपटातील आणखी एका दृश्यामध्ये एक महिला डिनरडेटवर जाताना अंतर्वस्त्र काढून जाताना दाखवण्यात आलं आहे. या सीनवर देखील प्रेक्षकांनी आक्षेप घेतला होता. चित्रपटातील आणखी काही दृश्यांवर जोरदार आक्षेप घेतला जात आहे. यापैकी एक दृश्य आहे ज्यामध्ये एक माणूस स्वतःला समलैंगिक असल्याचे सांगतो. त्याने केलेल्या या खुलाशाने त्याच्या मित्रांना धक्का बसतो.