प्रसिद्ध अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचा अपघाती मृत्यू झाला आहे. बंगालच्या टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सुप्रसिद्ध असलेली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तसंच या अभिनेत्रीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सुचंद्रा दासगुप्ता शनिवारी रात्री शूटिंगवरुन परतत होती. घरी परतण्यासाठी तिने एका APP वरुन बाईक बुक केली होती. रस्त्यात एक सायकल स्वार रस्ता ओलांडत होता. तो या अभिनेत्रीच्या रस्त्यात आला. त्यावेळी सुचंद्राने ब्रेक मारला. त्यावेळी एका ट्रकने या अभिनेत्रीला धडक दिली. त्यामुळे सुचंद्रा खाली पडली. त्यामागून आलेल्या ट्रकने तिला चिरडलं. ही धडक इतकी जबरदस्त होती की अभिनेत्री सुचंद्राचा जागीच मृ्त्यू झाला. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. तसंच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीही झाली होती.

case filed against entertainment company owner for unpaid dues of 1 25 crore rupees
कौटुंबिक वादातून महिलेवर चाकूने वार करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; बाणेर भागातील हाॅटेलमधील घटना
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
sandeep baswana on relationship with ashlesha sawant
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”

ट्रक डायव्हरला पोलिसांनी केली अटक

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ट्रक जप्त केला आणि ट्रक चालकाला अटक केली आहे. बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ताच्या मृत्यूमुळे बंगाली सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

कोण होती सुचंद्रा दासगुप्ता?

सुचंद्रा दासगुप्ता ही बंगाली सिनेसृष्टीतली प्रसिद्धी अभिनेत्री होती. बंगाली टीव्हीवरच्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं होतं. गौरी या मालिकेत सपोर्टिंग रोल केल्यानंतर ती बंगालच्या घराघरांत पोहचली होती. या अभिनेत्रीचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर होता. तिच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर तिचे चाहतेही दुःखात बुडाले आहेत. बिस्वरुप बंद्योपाध्याय मध्येही तिने काम केलं होतं.

Story img Loader