बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सनी लिओनीची एक पॉर्नस्टार म्हणून ओळख होती. अर्थात सनीला तिच्या भूतकाळाबद्दल कोणत्याही प्रकारचा पश्चाताप नाही. हे तिने स्वतः बऱ्याच मुलाखतींमध्ये खुलेपणाने सांगितलं आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करून सनीला दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. तरीही तिचा भूतकाळ अद्याप तिची पाठ सोडायला तयार नाही. याबाबत खुद्द सनीने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “अजूनही फिल्टर पाड्यातील चाळीतच राहतो कारण…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं कसं आहे खरं आयुष्य?

सनीने २०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. याबाबत बोलताना तिने सांगितलं की, “२०१२मध्ये चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणाऱ्या व्यक्तींमध्ये मी खूप वेगळी होती. नेहमीच चांगलं कायतरी घडलं पाहिजे यासाठी मी विचार करत असते. मला या देशामध्ये राहायला आवडतं. या चित्रपटसृष्टीबाबत मला प्रचंड प्रेम आहे. मला आतापर्यंत ज्या भूमिका करायला मिळाल्या त्याबाबत मी फार खूश आहे.”

“पण काम करत असताना काही वाईट अनुभवही आले. त्यामधूनच मला अधिक शिकायला मिळायलं. ज्यांनी मला सतत पाठिंबा दिला त्या सगळ्या चाहत्यांचे मी आभार मानते. कारण आज मी जे काही आहे हे माझ्या चाहत्यांमुळेच शक्य झालं आहे.” सनीने पुढे बोलताना तिला आता चित्रपटसृष्टीमध्ये काम मिळतं का? याबाबत सांगितलं.

आणखी वाचा – चाळीमध्ये पहिलं प्रेम मिळालं का? अंकुश चौधरी म्हणाला, “अपघातात तिचं निधन झालं अन्…”

सनी म्हणाली, “मी जेव्हा चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं तेव्हा काही जणं माझ्याबरोबर काम करणं टाळायचे. पण काही लोक असेही होते की ज्यांना माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा होती. मात्र आजही नावाजलेले प्रोडक्शन हाउस आणि सुप्रसिद्ध कलाकार माझ्याबरोबर काम करणं टाळतात.” सनी दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress sunny leone talk about her journey in bollywood film industry and says people still say no to work with me see details kmd