बॉलिवूडमधील एखादा वाद असो वा राजकीय मुद्दा अभिनेत्री स्वरा भास्कर याबाबत खुलेपणाने बोलताना दिसते. तिची काही वादग्रस्त विधानं चर्चेचा विषय ठरत असताच. नुकताच तिचा ‘जहाँ चार यार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. स्वरा सोशल मीडियावर नेहमीच तिचं मत परखडपणे मांडत असते. तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे तिला बऱ्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. काही दिवसांपूर्वी स्वरा भास्करने रणवीरच्या न्यूड फोटोशूटचे समर्थन केले होते. आता स्वरा भास्करने शाहरुख खान आणि निर्माता आदित्य चोप्रा यांच्यावर निशाणा साधला आहे.
स्वरा भास्करने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असे सांगितले की, ‘मी आदित्य चोप्रा सर आणि शाहरुख खानला माझे प्रेम जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी दोषी ठरवते’. आदित्य चोप्रा यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटात म्हणजे ‘दिलवाले दुल्हनिया’ मध्ये शाहरुख आणि काजोल हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने प्रेमकहाणीच्या बाबतीत आपला एक ठसा उमटवला आहे. अगदी कोवळ्या वयात तो चित्रपट पाहिल्याने मी देखील अनेकवर्ष राजच्या शोधात होते’. राजचं अस्तित्व नाही याची जाणीव तिला बऱ्याच वर्षांनी झाली. या चित्रपटाने तिला प्रेमाची एक वेगळी कल्पना दिली जी नंतरच्या आयुष्यात तिला खोटी असल्याचे समजले. मिडडे शी बोलताना तिने आपले हे मत व्यक्त केले होते.
जेव्हा रणबीर कपूरला एका पोलीस अधिकाऱ्यांनी ‘या’ कारणासाठी झापलं होतं
स्वरा भास्कर तिच्या आगामी चित्रपट ‘जहाँ चार यार’च्या प्रमोशनसाठी, दिग्दर्शक कमल पांडे, निर्माता विनोद बच्चन आणि सहकलाकार शिखा तलसानिया आणि पूजा चोप्रा यांच्यासह दिल्लीमध्ये होती. हा चित्रपट चार विवाहित मैत्रीणींबद्दल आहे. याशिवाय स्वराकडे गगन पुरी यांचा थ्रिलर ‘मीमांसा’ देखील आहे. नुकतीच ती ‘शीर कोरमा’ नावाच्या शॉर्ट फिल्ममध्ये दिसली होती.
स्वरा भास्कर मूळची दिल्लीची आहे. तिने दिल्लीत काही काळ नाटकांमध्ये काम केले आहे. अभिनयात करियर करण्यासाठी तिने मुंबई गाठली. २००९ साली तिने ‘माधोलाल कीप वॉकिंग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटाला अनेक पुरस्कारदेखील मिळाले होते. ‘रांझणा’ या चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली.