अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडिया, बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. आपल्या रोखठोक मतांमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकताच तिचा ‘जहाँ चार यार’ हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाला आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पहायला मिळत आहे. अनेक कार्यक्रमांचा भाग ती होताना दिसतेय. नुकत्याच एका मुलाखतीत अक्षय कुमार ज्या प्रकारचे चित्रपट करतो त्यांच्याशी ती सहमत नसल्याचा खुलासा तिने केला आहे.

आणखी वाचा : शाहरुखच्या ‘डॉन ३’मध्ये होणार ‘या’ अभिनेत्याची एंट्री, पाहिल्यांदाच शेअर करणार किंग खानबरोबर स्क्रीन

एका मुलाखतीत स्वराला विचारण्यात आले की, ‘बॉलीवूड सेलिब्रिटी सॉफ्ट टार्गेट असतात का?” यावर उत्तर देताना स्वरा म्हणाली, “आमचं काम लोकांना कथा ऐकवायचं, दाखवायचं आणि ते आम्हाला प्रामाणिकपणेचं केलं पाहिजे. मला वाटतं आपण कोणीही बॉलिवूडला प्रचार करण्याचे माध्यम बनवायला नको. बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या विचारांची लोकं कामं करतात, वेगवेगळया पद्धतीने व्यक्त होतात आणि हीच बॉलीवूडची खासियत आहे. अक्षय कुमार ज्या पद्धतीचे चित्रपट करतो त्याच्याशी सहमत नाही. पण म्हणून त्याचे चित्रपट अपयशी व्हावेत किंवा त्याने ते प्रदर्शित करू नयेत असा याचा मुळीच अर्थ नाही.”

पुढे, स्वरा भास्कर म्हणाली की, “लोकशाहीत लोकांना त्यांचे राजकीय विचार समोर आणता आले पाहिजेत. पूर्वी लोकांना वाटायचे, स्वरा ही समस्या आहे. आपण जे ग्रुपिझम करतोय त्याने कुणाचेही भले होणार नाही. गोष्ट फक्त एवढीच आहे की, मी रांगेत दुसऱ्यांच्या पुढे आहे.”

हेही वाचा : “बॉलिवूड म्हणजे ड्रग्ज, दारू, सेक्स आणि…” हिंदी चित्रपटसृष्टीच्या प्रतिमेबाबत स्वरा भास्करचं स्पष्ट मत

अक्षय कुमारचा ‘कठपुतली’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला. तर त्याव्यतिरिक्त अक्षयचे ‘बच्चन पांडे’,’सम्राट पृथ्वीराज’,’रक्षाबंधन’ असे तीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. हे तिन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस फारसे उतरले नाहीत. ‘बॉयकॉट बॉलिवूड’च्या ट्रेण्डमध्ये अक्षयच्या चित्रपटांनाही बॉयकॉट करण्याची मागणी सोशल मीडियावर झालेली पहायला मिळाली.

Story img Loader