अभिनेत्री स्वरा भास्कर कायमच सोशल मीडिया, बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. आपल्या रोखठोक मतांमुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकताच तिचा ‘जहाँ चार यार’ चित्रपट शुक्रवार, १६ सप्टेंबर,२०२२ रोजी चित्रपटगृहात दाखल झाला आहे. ‘ब्रह्मास्त्रसारखा’ प्रतिसाद या चित्रपटाला मात्र मिळाला नाही. प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. या चित्रपटाला IMDB ने केवळ १. १ इतके रेटिंग दिले आहे. या खराब रेटिंगनंतर हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात निरुपयोगी चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. एवढेच नाही तर कोणत्याही ट्रेड एक्सपर्टने चित्रपटाच्या कमाईबद्दल (जहां चार यार बॉक्स ऑफिस) कोणतीही माहिती दिलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात स्वरा भास्करच्या बरोबर मैहर विज, शिखा तलसानिया आणि पूजा चोप्रा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन कमल पांडे यांनी केले आहे. स्वरा भास्कर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप सक्रिय होती, परंतु पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे १५ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

‘पहिल्या नजरेतलं प्रेम, पुढे अनेक चढउतार…’ विराट अनुष्काची रोमँटिक लव्हस्टोरी

एकीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे तर दुसरीकडे समीक्षकांनीदेखील या चित्रपटावर टीका केली आहे. विनोद करण्याचा असफल प्रयत्न, अश्लील संवाद या गोष्टींनी हा चित्रपट भरलेला आहे असं समीक्षकांचं म्हणणं आहे. चित्रपटात चार महिला घरातून बाहेर पडतात आणि एकत्र मजा करतात हे दाखवण्यात आले आहे.

IMDB रेटिंग म्हणजे नेमकं काय?

IMDb ही इंटरनॅशनल चित्रपट रेटिंग आणि समीक्षणाची एक खूप मोठी, प्रसिद्ध वेबसाइट आहे, ज्याचे पूर्ण रूप इंटरनेट चित्रपट डेटाबेस आहे. १७ ऑक्टोबर १९९० रोजी ही वेबसाइट सुरू करण्यात आली.या वेबसाइटवर लोकांकडून जास्त रेटिंग मिळालेला कोणताही चित्रपट सुपरहिट मानला जातो आणि ज्या चित्रपटाला कमी रेटिंग दिले जाते तो फ्लॉप मानला जातो.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress swara bhaskar film jahan chaar yaar flop at theatre get 1 1 imdb rating spg