अभिनेत्री आणि निवेदिका तबस्सूम यांचे शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांनाही धक्का बसला आहे. दरम्यान, त्यांनी सत्तरच्या दशकात निवेदनाच्या माध्यमातून दूरदर्शनवरील ‘फुल खिले है गुलशन गुलशन’ हा कार्यक्रम गाजवला होता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांच्या असतानाच त्यांनी चित्रपटात अभिनयास सुरुवात केली होती.

हेही वाचा >>> व्हीलचेअरवर बसून तबस्सूम शो होस्ट करत असतानाच आग लागली अन्…; अमिताभ बच्चन यांनी वाचवलेला जीव

The Storyteller Movie Review in marathi
द स्टोरीटेलर : गोष्टीच्या गोष्टीची सुरेख वीण
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Pandharinath Sawant was cremated at Bhoiwada crematorium in Mumbai.
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे निधन
nagpur married woman refued to have sex boyfriend killed her and raped her body
पुणे : धनकवडीत तरुणाची आत्महत्या, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा
kshitee jog mugdha karnik
‘पारू’ फेम मुग्धा कर्णिक क्षिती जोगबरोबरच्या मैत्रीबद्दल म्हणाली, “मी कुठल्या अडचणीत…”
Crime News in marathi
Crime News : २५ वर्षीय विवाहितेच्या मृत्यूनंतर उलगडली छळाची आणि शोषणाची अंगावर काटा आणणारी कहाणी, कुठे घडली घटना?
Anna Beatriz Pereira Alves dies
ॲडल्ट चित्रपटाचं शूटिंग करताना घडली भयंकर घटना, हॉटेलच्या बाल्कनीतून कोसळून २७ वर्षीय अभिनेत्रीचा मृत्यू
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू

९ नोव्हेंबर रोजी तबस्सूम यांची ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात एक मुलाखत प्रसिद्ध झाली होती. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली होती. यामध्ये त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात कशी आणि कधी झाली, यावर भाष्य केले होते. “मी १९४७ मध्ये बेबी तबस्सूम म्हणून माझं करिअर सुरू केलं. तेव्हा मी तीन वर्षांची होते. माझ्या पहिल्या सिनेमाचं नाव होतं नर्गिस. हिरॉइन होती नर्गिस आणि हिरो होते रेहमान. मी छोट्या नर्गिसचं काम करत होते. माझी मोठी आणि चांगली भूमिका होती. मी आजपर्यंत सहा माध्यमांमधून काम केलं आहे,” असं तबस्सूम यांनी तेव्हा सांगितले होते.

हेही वाचा >>> “निधनानंतर दोन दिवस…” तबस्सूम यांच्या शेवटच्या इच्छेबाबत मुलाचा खुलासा

“१९४५चं आकाशवाणीचं एक मासिक आहे, त्यात मुखपृष्ठावर तेव्हा माझं छायाचित्र प्रसिद्ध झालं होतं. मी तेव्हा ‘फुलवारी’ नावाचा लहान मुलांचा कार्यक्रम करत असे. १९४८ पासून मी ऑल इंडिया रेडिओवर रेडिओ जॉकी म्हणून काम केलेलं. माझे आईवडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक होते, पत्रकार होते. ते स्वत:चं मासिक काढत. अली सरदार जाफरी, कैफी आझमी, मजरूह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी हे तेव्हा आमच्या मासिकात लिहीत. माझं लहानपण या लोकांच्या अंगाखांद्यावर गेलं,” अशी आठवण त्यांनी आपल्या या मुलाखतीत सांगितली होती.

दरम्यान, तबस्सूम यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. १९४७ साली बालकलाकार म्हणून तबस्सुम यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली. १७७२ ते १९९३ या सलग २१ वर्षे चालणाऱ्या दुरदर्शन वाहिनीवरील ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या कार्यक्रमाचे त्यांनी सूत्रसंचलन केले होते. ‘तला’, ‘हिर रांझा’,’गॅम्बलर’, ‘जानी मेरा नाम’, ‘तेरे मेरे सपने’, ‘सूरसंगम’, ‘अग्निपथ’,’नाचे मयुरी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी काम केले.

साप्ताहिक ‘लोकप्रभा’मध्ये तबस्सूम यांची प्रकाशित झालेली पूर्ण मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Story img Loader