बॉलिवूड अभिनेत्री तब्बूने रुपेरी पडद्यावर साकारलेली प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आपल्या दमदार अभिनयामुळे ती कायम चर्चेत असतेच. पण त्याचबरोबरीने तिच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. तब्बूने वयाची पन्नाशी गाठली आहे. तरीदेखील तिचं सौंदर्य आजच्या तरुण अभिनेत्रींना लाजवेल असं आहे. पण तिच्या सौंदर्यामागचं रहस्य नेमकं काय? आजही तरुण दिसण्यासाठी तब्बू काय करते? हे तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपलं सौंदर्य अधिक उठून दिसावं याकडे तब्बू अधिकाधिक लक्ष देते. पण यासाठी ती तिच्या दिनक्रमामध्ये काही खास बदल करत नाही. फिल्मी कम्पॅनियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तब्बूला तिच्या वाढत्या वयामधील सौंदर्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा तिने अगदी हसत उत्तर दिलं. आपण कोणता खास उपाय फॉलो करत नसल्याचंही तिने यावेळी म्हटलं.

तब्बूच्या सौंदर्यामागचं रहस्य काय?
“माझ्या सौंदर्यामागे कोणतंच सिक्रेट नाही. माझी मेकअप आर्टिस्ट मिताली मला बोलत होती की मॅम तुमची त्वचा खूप सुंदर आहे. तुम्ही यासाठी काही उपाय करता का? मी जर तिला काही उत्तर दिलं तर तिने मला सांगितलं असतं की तुम्ही मी सांगेन त्याप्रकारच्या क्रिमचा वापर करा आणि पुन्हा ५० हजार रुपयांची क्रिम मला दिली असती. एकदाच एवढी महागडी क्रिम मी खरेदी केली. पण आता पुन्हा नाही.” असं तब्बूने या मुलाखतीमध्ये सांगितलं.

आणखी वाचा – …अन् करीना कपूरने बिपाशा बासूच्या कानाखाली मारली, तेव्हा नेमकं काय घडलं होतं?

पुढे म्हणाली, “आपल्याला कशाप्रकारे सुंदर दिसता येईल हे मला चांगलं ठाऊक आहे. त्यामध्ये मी काहीच बदल करत नाही. सगळ्यांनाच चांगलं दिसायला आवडतं. तसेच निरोगी राहायला आवडतं. मीदेखील तेच करते.” म्हणजेच सुंदर दिसण्यासाठी तब्बू कोणत्याच महागड्या क्रिमचा किंवा प्रॉडक्टचा वापर करत नाही हे यामधून स्पष्ट होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress tabu once purchase 50 thousand rupees cream for face says will never make that mistak see details kmd