बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. तनुश्री ही हॅशटॅग Metoo प्रकरणामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाच्या सेटवर प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी लैंगिक गैरवर्तणूक केल्याचा आरोप तनुश्रीने केला. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. आता पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. तनुश्रीने काही वर्षांनंतर नाना पाटेकर यांच्यावर राग व्यक्त करत इन्स्टाग्रामद्वारे पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – Video : तीन वेळा आयव्हीएफ, हाती अपयश अन् गंभीर आजाराचं निदान, अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोर अश्रू अनावर 

Shyam Manav comment on Ladki Bahin Yojana,
‘लाडकी बहीण योजना अर्थव्यवस्थेला चालना देणारी’, काँग्रेसच्या सभेत अंनिसचे श्याम मानव म्हणाले….
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो

तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याबाबत पोस्ट शेअर करताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच पुढे तिचं काही झालं तर त्यासाठी नाना पाटेकर जबाबदार असतील असं तनुश्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

तनुश्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, “जर पुढे माझं काही झालं तर त्यास नाना पाटेकर, त्यांचे वकील आणि टीम तसेच बॉलिवूड माफिया मित्र जबाबदार असतील. बॉलिवूड माफिया कोण आहेत? सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणी ज्या व्यक्तींची नावं समोर आली तेच लोक बॉलिवूड माफिया आहेत. (या सगळ्यांचे वकील सारखेच होते.)”

आणखी वाचा – “तुम्ही खूप कमी बोलता अन्…” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

पुढे तिने म्हटलं की, “अशा बॉलिवूड माफियांचे चित्रपट पाहू नका. त्यांना पूर्णपणे बॉयकॉट करा. कलाक्षेत्रातील काही लोकांनी आणि पत्रकारांनी माझ्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या. ज्यांनी मला खूप त्रास दिला त्यांचं जीवन नरकासारखं बनवा. कायदा आणि न्याय याबाबत मी अपयशी ठरले. पण मला या महान राष्ट्रामधील लोकांवर विश्वास आहे. जय हिंद आणि बाय. पुन्हा भेटू.” या पोस्टनंतर “तुला पुन्हा एकदा प्रसिद्धी हवी आहे का?” असा प्रश्न तनुश्रीला कमेंटच्या माध्यमातून नेटकरी विचारत आहेत.