टीव्ही अभिनेत्री तेजस्वी प्रकाश गेल्या अनेक दिवसांपासून काही ना काही कारणाने चर्चेत असते. मग त्या चर्चा तिच्या कामाबद्दल असो किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल. ती नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. अलीकडेच, तेजस्वी आणि तिचा प्रियकर करण कुंद्रा यांचे एक गाणे एका अल्बममार्फत रिलीज झाले, ज्याला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता तेजस्वीशी संबंधित मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून छोट्या पडद्यावरुन आपल्या भेटीला येणारी तेजस्वी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे ती एका मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

तेजस्वी प्रकाश ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. त्यासोबतच तेजस्वी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता लवकरच तेजस्वी ही मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तेजस्वीने स्वतः ही माहिती दिली आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
virat kohli anushka sharma alibag bunglow gruhapravesh
Video : विरुष्काच्या अलिबागमधील नव्या घराचा होणार गृहप्रवेश, फुलांनी सजलेल्या बंगल्याचा व्हिडीओ व्हायरल
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार

लग्नानंतर एका आठवड्यातच तेजस्वीच्या आईला सोडून दुबईला निघून गेले होते वडील

नुकतचं तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. तेजस्वी लवकरच ‘मन कस्तुरी रे’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. या पोस्टरचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. याला कॅप्शन देताना ती म्हणाली, “मन सांगे हे मला वेड लागे या जीवा सवरु नको रे मला….. नव्या स्पंदनांची नवी लव्हस्टोरी मन कस्तुरी रे, ४ नोव्हेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात !” या पोस्टरमध्ये अभिनेता अभिनय बेर्डे तेजस्वीसोबत दिसत आहे.

बिग बॉस १५ फेम अभिनेत्री मराठी चित्रपटात, लक्ष्याच्या मुलासोबत करणार ऑनस्क्रीन रोमान्स

या पोस्टरमध्ये दोघेही एकत्र स्कूटरवर जाताना दिसत आहेत. तर तेजस्वीच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसत आहे. त्याचवेळी अभिनय घाबरून स्कूटरचा तोल सांभाळताना दिसत आहे. या चित्रपटात अभिनयसोबत तेजस्वी ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या दोघांची केमिस्ट्री ही प्रेक्षकांसाठी एक प्रकारे मनोरंजनाची मेजवानी ठरणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान ‘मन कस्तुरी रे’ हा चित्रपट येत्या ४ नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. तेजस्वी गेली काही वर्षे ‘संस्कार -धरोहर अपनों की’, ‘स्वरांगिनी जोडे रिश्तों के सूर’, ‘पहरेदार पिया की’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ आणि ‘बिग बॉस १५’ मधून प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्यानंतर आता तेजस्वी ही मराठी चित्रपटातून झळकणार आहे.

Story img Loader