मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडितला ओळखले जाते. अनेक चित्रपट, मालिका, वेबसीरिज या मनोरंजनाच्या विविध माध्यमांत हटके भूमिका साकारत तेजस्विनीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या या भूमिकांचे प्रचंड कौतुकही झाले. तेजस्विनीने आता निर्माती क्षेत्रात पदार्पण केले आहे. काही दिवसांपूर्वी तिची निर्मिती असलेला ‘अथांग’ ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. त्यानंतर आता तिचा बांबू हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

तेजस्विनी पंडितने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अभिनेत्री नम्रता संभेराव या दोघांवर चिडल्याचे दिसत आहे. त्यावेळी नम्रता ही तिला सॉरीही बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “नागराज मंजुळे आकाशला…” मराठी सिनेसृष्टीतील गटबाजीबद्दल तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की

या व्हिडीओच्या सुरुवातीला तेजस्विनी प्रसादला ‘तू कसा आहे?’ असं विचारते. त्यावर तो म्हणतो ‘माझं ठिक आहे, तू काय प्रमोशनसाठी आलीय का?’ त्यावर तेजस्विनी म्हणते, ‘हो अरे…’ त्यानंतर ती ‘ए पश्या, तुझ्या टीशर्टवर बांबू लिहिलंय का?’ असं विचारते. त्यावर प्रसाद म्हणतो, ‘नाही ते बाबू’ असं आहे. त्यावर नम्रताही त्याला पाठिंबा देते.

त्यानंतर तेजस्विनीने नम्रताला विचारते, ‘नमू मला वाटलेलं तुम्ही बांबूचं थोडं तरी प्रमोशन कराल?’ त्यावर नम्रता ‘सॉरी सॉरी’ म्हणतं कपाळावरची टिकली काढते आणि प्रसादच्या टी-शर्टवर चिकटवते. त्यामुळे ‘बांबू’ लिहित येत्या २६ जानेवारीपासून चित्रपटगृहात असं दोघेही सांगताना दिसत आहे.

आणखी वाचा : “शिरीन ही भूमिका माझी होती, पण सई ताम्हणकरने…” तेजस्विनी पंडितचा ‘दुनियादारी’बद्दल मोठा गौप्यस्फोट

दरम्यान या चित्रपटात अभिनय बेर्डे हा मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्याबरोबर पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, शिवाजी साटम, समीर चौघुले, अतुल काळे आणि स्नेहल शिदमही पाहायला मिळत आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते तेजस्विनी पंडित, संतोष खेर आहेत. ‘बांबू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले आहे.

Story img Loader