टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला आत्महत्या करत जीवन संपवलं. २० वर्षीय अलिबाबा: दास्तान ए कबूल मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान खान पोलिसांच्या कोठडीत असून त्याची चौकशी सुरू आहे. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी म्हणजेच २७ डिसेंबरला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. पण आता मुंबई पोलिसांना शिझान खानच्या मेकअप रुममधून एक कागदाचा तुकडा सापडला आहे.
तुनिषा शर्माने २४ डिसेंबरला ‘अलीबाबा दास्तान ए काबुल’ या मालिकेच्या सेटवर गळफास घेत जीवन संपवलं. तुनिषाच्या आत्महत्येमुळे तिच्या कुटुंबियांसह मित्र-मैत्रिणींनाही धक्का बसला. तिच्या आत्महत्येच्या तीन दिवसांनी म्हणजेच २७ डिसेंबरला तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषा शर्मा प्रकरणी पोलीस सातत्याने चौकशी करत आहे. या प्रकरणी शिझान खानची कसून चौकशी केली जात आहे.
आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर
शिझान खानने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी तुनिषाचा मृत्यू झाला, त्या दिवशी त्या दोघांनी एकत्र जेवण केले होते. त्या दोघांमध्ये १५ मिनिटे संभाषणही झाले होते. त्यावेळी या दोघांच्या चेहऱ्यावर राग पाहायला मिळत होता. यानंतर शिझान हा त्याचा सीन शूट करण्यासाठी निघून गेला. तर तुनिषा ही त्या मेकअप रुममध्येच बसलेली होती.
यानंतर आता बुधवारी संध्याकाळी पोलिसांना शिझान खानच्या मेकअप रुमची झाडाझडती घेतली. त्यावेळी पोलिसांना त्यात एक कागदाचा तुकडा सापडला आहे. “माझ्यासारखा सहकलाकार मिळाल्याने तो आनंदी आहे. Woohooo”, असे त्या कागदावर लिहिण्यात आले आहे. त्याबरोबर त्यात तुनिषा आणि शिझान या दोघांची नावही लिहिण्यात आली आहेत. या आधारे पोलीस आता इतर गोष्टींचा शोधही घेत आहे. तिने हे कधी लिहिले होते? याचा अर्थ नेमका काय? याचा तपासही पोलिसांकडून सुरु आहे.
आणखी वाचा : “तुनिषा शर्माच्या आत्महत्येदिवशी…” प्रसिद्ध अभिनेत्याने व्यक्त केली खंत
दरम्यान तुनिषा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘अलिबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. या मालिकेच्या सेटवरच तिने मेकअप रुममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. तुनिषाने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. तिच्या जाण्याने मालिकाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.