अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर उर्वशी सोशल मीडियावर बरीच ट्रोल झाली होती. तिच्या पोस्टवर कमेंट्स करत युजर्सनी तिला खूप सुनावलंही होतं. आता पुन्हा एकदा ती नेटकऱ्यांच्या रडारवर आली आहे. ‘कांतारा’फेम रिषभ शेट्टीबरोबरच्या त्या पोस्टमुळे तिला ट्रोल केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता रिषभ शेट्टी कांतारा चित्रपटामुळे आता प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. देशातच नव्हे तर जगभरात त्याचे नाव झाले आहे. रिषभकडे सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. नुकतीच उर्वशीने अभिनेत्याची भेट घेतली, आणि त्याच्याबरोबरचा फोटो शेअर करत कॅप्शन दिला आहे, “कांतारा २ लोडींग,” तिच्या पोस्टवरून चर्चांना उधाण आले. कांताराच्या पुढील भागात आता उर्वशी दिसणार का अशी चर्चा सुरु झाली. नेटकऱ्यांनी मात्र तिला ऋषभ पंतवरून ट्रोल केलं आहे.

“आधी गरोदर मग लग्न बॉलिवूडमध्ये…” प्रसिद्ध अभिनेत्याने कियारा अडवाणी -सिद्धार्थ मल्होत्राला लगावला अप्रत्यक्ष टोला

उर्वशीच्या फोटोवर एकाने लिहले आहे, “ताई तुमच्या आयुष्यात किती ऋषभ जोडले गेले आहेत?” तर आणखीन एकाने लिहले आहे, “ऋषभ पंत नाही तर रिषभ शेट्टी,” दुसऱ्याने लिहले आहे, “हिने आता ऋषभला सोडून दिलंय आणि रिषभला पकडलंय.” मात्र काही लोकांनी तिचे कौतुक केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला तिच्या आगामी ‘वॉल्टेयर वीरैया’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात उर्वशी दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवींसह आयटम सॉंग करताना दिसली आहे. तसेच या आयटम सॉंगसाठी तिने कोटीत मानधन घेतले आहे.