सुनीता पवार या महिलेचा संघर्ष आपल्याला माहीत आहेच. तिचं आयुष्यही आपल्यासारखंच आनंदी होतं पण एका अपघातामध्ये नियतीने तिचे दोन्ही हात हिरावून घेतले. १२ वर्षांपूर्वी पतीसह ती एका बंगल्याच बांधकाम करत होती. तेव्हा, एका महिलेला करंट लागला त्या महिलेला वाचवत असताना सुनीताला आपले दोन्ही हात गमवावे लागले. सुनीता तेव्हा सहा ते सात महिन्याची गरोदर होती असे तिने सांगितले . करंट लागल्यावर तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले पण तिचे दोन्ही हात वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच ‘हवाहवाई’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी सुनीता पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्या या प्रवासाबद्दल माहिती शेअर केली. अभाळाएवढं संकट कोसळलं तरी त्याला जिद्दीने सामोरं जाणाऱ्या सुनीता पवारसारख्या महिलांचा आदर्श आपण सगळ्यांनीच ठेवला पाहिजे असा मेसेज त्यांनी या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिला. सुनिताच्या घरी जाऊन चित्रपटाचे दिग्दर्शक महेश टिळेकर आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी तिच्या या जिद्दीचं कौतुक केलं आहे.

‘हवाहवाई’ हा चित्रपट कष्ट करणाऱ्या आणि विविध ठिकाणी फूड स्टॉल्स चालवून लोकांचं आणि स्वतःचं पोट भरणाऱ्या महिलांना समर्पित केला आहे. चित्रपटामधून अशाच एका सर्वसामान्य कष्टकरी गृहिणीची कथा मांडण्यात आली आहे.

आणखी वाचा : “अमिताभ बच्चन यांच्यामुळे…” दिवंगत कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांनी मानले होते आभार

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी याला उत्तम प्रतिसाद दिला आहे. ‘वन रूम किचन’सारख्या चित्रपटानंतर बऱ्याच वर्षांनी महेश टिळेकर पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. चित्रपटात समीर चौघुले, वर्षा उसगांवकर, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, सिद्धार्थ जाधवसारखे कलाकार आपल्याला बघायला मिळणर आहेत. ७ ऑक्टोबरला हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.