आज महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे, देशात आज दिवसागणिक महिलांच्याबाबतीत छेडछाडीचे प्रमाण वाढत चालले आहे. सामान्य स्त्रियांच्याबरोबरीने बॉलिवूड अभिनेत्रींनादेखील याचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री कंगना रणौतच्या बहिणीवरदेखील ऍसिड हल्ला झाला होता तसेच तिच्याबरोबरदेखील गैरवर्तणूक काही तरुणांनी केली होती. याच मुद्द्यावर आता अभिनेत्री यामी गौतमने भाष्य केलं आहे.
यामी गौतम ही आजच्या पिढीतल्या आघाडीची अभिनेत्री मानली जाते. यामी गौतमचा जन्म हिमाचल प्रदेशच्या बिलासपुर येथे झाला. लहानपणाासून ती थोडी लाजरी बुजरी होती. नुकतीच तिने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक प्रकार सांगितला आहे. ती असं म्हणाली की “मला आठवतंय व्हॅलेंटाइन असला की मला थोडं अवघडल्यासारखं व्हायचं, मला ते अजिबात आवडायचे नाही. माझे वडील कामानिमित्त बाहेर असायचे त्यामुळे क्लासेसना आम्ही रिक्षातून जात असू, तेव्हा काही मुलं गाड्यांवरून यायचे. आणि ते आमच्याकडे एकटक बघत बसायचे, मला थोडं विचित्र वाटायचे.”
सूर्यास्त, समुद्रकिनारा आणि बिकिनीतला बोल्ड अंदाज; बॉलिवूडच्या अभिनेत्रीला ‘या’ ओळखलंत का?
आणि यामी बरोबर घडला ‘तो’ प्रसंग :
तिच्याबरोबर घडलेल्या एका प्रसंगाबद्दल ती असं म्हणाली, “मी एकदा रिक्षातून जात असताना माझ्या बाजूने दोन मुलं गाडीवर जात होते. मी त्यांच्याकडे बघत नव्हते म्हणून कदाचित त्यांना राग आला असावा, कारण त्याने त्याचा हात पुढे केला त्याला बहुतेक माझा हात पकडायचा असावा पण मी मात्र त्याच्या कानशिलात लगावली, इतकं धाडस माझ्यात कुठून आलं माहिती नाही, ते दोघेदेखील घाबरले होते.” हा धक्कादायक प्रसंग तिने सांगितला.
यामीने अभिनयात करियर करण्यासाठी मुंबई गाठली होती. तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. त्यानंतर यामीने ‘चांद के पार चलो’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं. तसंच ती ‘यह प्यार न होगा कम’ मध्ये ती गौरव खन्ना बरोबर दिसली. विक्की डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘उरी’, ‘काबिल’, ‘बाला’, ‘अ थर्सडे’ यासारख्या चित्रपटातही तिने काम केलं