माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री युक्ता मुखी हिने नव-याविरोधात आंबोली पोलीस चौकीत मंगळवारी रात्री तक्रार दाखल केली आहे. युक्ताचा पती नागपुरस्थित हॉटेल मालक प्रिन्स टुली असून त्याच्याविरोधात शारीरिक आणि मानसिक छळ करण्याचा आरोप तिने केला आहे. पोलिसांनी टुलीविरुद्ध अनैसर्गिक लैगिंक संबंध आणि मानसिक छळाचा गुन्हा नोंदविला आहे.
” आम्ही युक्ताचा जबाब रेकॉर्ड केला असून संपूर्ण चौकशी करुन एक-दोन दिवसांमध्ये टुली आणि त्याच्या कुटुंबियांना अटक करु, असे आंबोली चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर मेढे म्हणाले.”
टुली आणि युक्ता २००८ मध्ये विवाहबद्ध झाले होते. मात्र २०१२ साली युक्ता मुंबईला निघून आली होती. तेव्हापासून ती तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा